व्हायरल
मुंबई, 7 मार्च : आज धुलिवंदन असून सर्वत्र रंगीबेरंगी वातारवरण पहायला मिळत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण रंगांची मजा घेताना दिसत आहे. सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पहायला मिळत आहे. सकाळपासून धुलिवंदनाचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पहायला मिळत आहे. अशातच मुंबई लोकलमधील आणखी एक व्हिडीओ समोर आला असून व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही ओठांवर हास्य उमटेल. धुलिवंदनाच्या निमित्ताने मुंबई लोकलमधील एक व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये, ट्रेनमध्ये खूप गर्दी पहायला मिळत आहे. ट्रेनमध्ये सर्वजण गाणी म्हणत जामिंग करताना दिसत आहे. एकमेकांच्या सुरात सूर मिसळून सर्वजण तल्लीन होऊन गाणं म्हणत आहे. काहींच्या तोंडाला कलर सुद्धा लागलेला दिसत आहे. त्यामुळे लोकलमध्ये होळीचा रंग खेळला गेल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अनेकांचं मन जिंकत आहे.
@Chilled_Yogi नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ 4 मार्चला शेअर करण्यात आला होता. मात्र आता धुलिवंदनाच्या निमित्ताने तो तुफान व्हायरल होत असून चर्चेत आला आहे.
दरम्यान, होळी, धूलिवंदन हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून आणि त्यांच्या तक्रारी विसरून, गळाभेट घेऊन आनंद साजरा करतात. धूलिवंदनाच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाते, यावेळी सर्व प्रकारचे वाईट आणि नकारात्मकता मनातून काढून टाकली जाते.