परंपरा
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : भुकेलेल्या व्यक्तीला जेवण खाऊ घालणं हे पुण्याचं काम असतं. त्यामुळे भारतात घरी आलेल्या व्यक्तींना जेवण खाऊ घालण्याची परंपरा आहे. घरच्या व्यक्तींनाही आपण आदराने जेवण देतो. मात्र कोणी जेवण देताना ताटाला लाथ मारुन देत असेल तर? हो तुम्ही बरोबर वाचलंत. असंही एक ठिकाण जेथे जेवनाचं ताट देताना त्याला लाथ मारली जाते. हे नेमकं ठिकाणं कोणतं आहे आणि हे काय प्रकरण आहे याविषयी जाणून घेऊया. कोणी आपल्या नवऱ्याला जेवन देताना ताटाला लाथ मारुन देतं, हे ऐकूनच लाजिरवाणं वाटत आहे. मात्र नेपाळमधील दक्षिण भागात आणि भारताच्या उत्तर भागात तराई प्रदेशाजवळ थारू जमातीचे वास्तव्य आहे. लाथ मारून अन्न देणं ही या जमातीची सर्वात विचित्र परंपरा आहे. असं मानलं जातं की ते राजपूत होते जे थारच्या वाळवंटातून नेपाळच्या दिशेनं स्थलांतरित झाले. ते हिंदू आहेत आणि भगवान शिवाची पूजा करतात. असे मानले जाते की थारू जमातीचे सुमारे 1.7 लाख लोक भारतात राहतात तर नेपाळमध्ये त्यांची संख्या 1.5 दशलक्षाहून अधिक आहे. हेही वाचा - चक्क मित्राच्या बायकोच्याच प्रेमात पडली महिला; तिघांनी मिळून घेतला असा निर्णय थारु जमातीच्या स्त्रिया ताटावर लाथ मारुन जेवन देतात. ते पहिल्यांदा ते कपाळावर लावतात आणि नंतर लाथ मारुन पुरुषांकडे ढकलतात. ही परंपरा आता या जमातीतील एक भाग बनली आहे. ओरिसा पोस्ट आणि मॅगझिन वेबसाइटच्या अहवालानुसार, ही जमात पितृसत्ताक परंपरा पाळत नाही, तर मातृवंशीय परंपरा पाळते. इथल्या घरच्या प्रमुख महिला आहेत. यामागचे कारण म्हणजे, 1576 मध्ये हल्दीघाटी युद्धादरम्यान, महाराणा प्रतापच्या सैन्यातील उच्चपदस्थ सैनिक आणि सरदारांनी त्यांना त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी इतर सैनिक आणि नोकरांसह हिमालयाच्या पायथ्याशी पाठवले. हे लोक तराई प्रदेशात पोहोचले आणि त्यांनी तेथे आपले वास्तव्य केले. या लोकांना थारू म्हणत. येथे पोहोचल्यानंतर महिलांना त्यांच्या सामाजिक सुरक्षेचे उल्लंघन झाल्याचे लक्षात आले. या कारणास्तव, तिला फक्त तिच्याबरोबर आलेल्या खालच्या दर्जाच्या सैनिक आणि नोकरांशी लग्न करण्यास भाग पाडले गेले. ती या लग्नात अजिबात खूश नव्हती कारण हे सर्व उच्च जातीचे आणि श्रीमंत कुटुंबातून आले होते. उच्चवर्णीय आणि राजघराण्यातील विशेष असल्याचा अभिमान त्यांना होता. तेव्हापासून तिने स्वत:ला कुटुंबप्रमुख मानले आणि पतींना लाथ मारूनच अन्न द्यायला सुरुवात केली. याने ती आपला शाही अभिमानही तृप्त करत असे.
हळूहळू या अभिमानाने परंपरेचे रूप धारण केले. यामुळेच आजही या जमातीतील महिला दागिन्यांनी सजतात. समाजात बदल झाल्यानंतर फार कमी लोक परंपरा पाळतात, पण ती आजही कायम आहे.