नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : प्रेम आणि लग्न या दोन्हींनाही खूप महत्त्व आहे. याविषयीच्या अनेक घटना समोर येत असतात. आपण विचारही करु शकत नाही अशा घटनाही जगभरात घडत असतात. अशातच प्रेम आणि लग्नाविषयीची आणखी एक हटके स्टोरी समोर आली आहे. ही स्टोरी वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. लग्नाच्या काही महिन्यांतच एका महिलेचं तिच्या नवऱ्यासोबत भांडण झालं. दोघेही वेगळे झाले. त्यानंतर ती महिला आपल्या विवाहित मित्राकडे राहण्यासाठी आली. आणि तिला तिथे मित्राच्या पत्नीविषयी भावना निर्माण झाल्या. त्यानंतर दिघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. ही घटना पिड्डू कौर, स्पिटी सिंह आणि सनी सिंह यांची असून सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी त्यांची कहानी एका व्हिडीओमध्ये सांगितली आहे. हेही वाचा - भररस्त्यात तरुणाने आंटीला केलं प्रपोज तर अंकलने धू धू धूतलं, Video व्हायरल पिड्डू स्मिटी आणि सनी तिघेही मुळचे भारतीय आहेत. पिड्डूने 2009 मध्ये अरेंज मॅरेज केलं आणि अमेरिकेला शिफ्ट झाली होती. मात्र काही महिन्यांतच तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर ती तिचा मित्र सनीकडे काही दिवस रहायला गेली. तिथे त्याची पत्नी स्मिटीही होती. दोघींमध्ये एकमेंकींविषयी भावना निर्माण झाल्यावर त्यांनी सनीला याविषयी सांगितलं. आणि त्यांनी तिघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी थ्रुपल रिलेशशीपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना सध्या चार मुले आहेत.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, वयाच्या 16 व्या वर्षी अमेरिकेत शिफ्ट होण्यापूर्वी स्पिटी दुसऱ्या एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होती. लग्नाच्या एक वर्षानंतर तिने ही गोष्टी तिचा नवरा सनीला सांगितली. सनीने हे स्वीकारले. सनी आणि स्पिटी यांनी अनेकवर्ष डेट केल्यानंतर लग्न केले. त्याते कुटुंब एकमेकांना लहानपणापासूनच ओळखत होते. स्पिटी सांगते की, सुरुवातीला पिड्डूची रिलेशमध्ये एण्ट्री झाल्यावर खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागली. एकमेकांसोबत काही गोष्टींवर सहमत व्हायला वेळ लागला.
तिघांच्या या रिलेशनला सुरुवातील कुटुंबाचीही परवानगी नव्हती. नातेवाईकांनीही टोमणे दिले. याविषयी सनीची आई म्हणाली की, मुलांच्या आनंदाविषयीची चिंता वाटत होती. पण त्यांनी ते व्यवस्थितरित्या मॅनेज केले. मी अशा नात्याविषयी कधीच ऐकले नव्हते. पण मुलं आनंदी आहेत तर बाकीच्या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही.