प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 27 जुलै : आपण कुठेही काम करत असलो तरी सुट्टीसाठी आपल्याला बॉसची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे काही कर्मचारी बॉसला मेल करतात. तर काही फोन करुन विचारतात, तर काही कर्मचारी समोरा-समोर याबद्दल संभाषण करतात. पण आत्ता सोशल मीडियाच्या युगात काही लोक वॉट्सऍपवरुन देखील आपल्या बॉसशी ऑफिशिअर गोष्टी शेअर करु लागले आहेत. असंच एका महिला कर्माचरीने केलं, तेव्हा तिला धक्काच बसला. या संभाषणाचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. खरंतर कर्मचारीने अर्धवट मेसेज केल्यामुळे आणि बॉसच्या बायकोनेही तो अर्धवट मेसेज वाचल्याने त्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाला आणि दोघांमध्ये भांडणं सुरु झाली. विसरलेल्या फोनचं लॉक स्क्रीन पाहताच सर्वांनाच बसला धक्का, नक्की त्यात असं काय होतं? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर व्हायरल झालेल्या या व्हॉट्सऍप चॅटचा स्क्रीनशॉट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे आणि लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. पोस्टमधील व्हॉट्सऍप चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये एका महिला कर्मचाऱ्याने तिच्या बॉसला प्रथम बॉस असं लिहून पाठवल आणि नंतर दुसऱ्या ओळीत महिला कर्मचारी तिच्या बॉसला ती गर्भवती असल्याचे सांगते. तिसर्या ओळीत, कर्मचाऱ्याने लिहिले की, मला काही दिवसांची सुट्टी हवी आहे, जेणेकरून ती याबद्दल तिच्या प्रियकराशी बोलू शकेल. यानंतर महिला कर्मचाऱ्याने लिहिले की, कृपया माझी रजा मंजूर करा.
स्क्रीनशॉटमध्ये, बॉसने दिलेले उत्तर तुम्ही पुढे पाहू शकता, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, कृपया, प्रथम माझ्या पत्नीशी हे सर्व चर्चा करा, कारण तिने तुझे पहिले काही मेसेज वाचले आहेत. यासोबतच बॉसने असेही लिहिले की, तु हे सर्व एका मेसेजमध्ये का नाही लिहिले? साहजिकच मेसेज वाचून तुम्हाला समजले असेल की बॉसच्या बायकोचा कशामुळे गैरसम झाला असावा. आतापर्यंत 37 दशलक्ष लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे, तर 6 लाखांहून अधिक लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे. या पोस्टवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण या पोस्टला मजेशीरपणे घेत आहेत, तर काहीजण त्याचा आनंद घेत आहेत.