ढाका 23 ऑगस्ट : इंटरनेटचं जाळं हे असं जाळं आहे, येथे आपल्याला अनेक गोष्टींची माहिती मिळते, इतकेच काय तर येथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फोटो, व्हिडीओ पाहायला मिळतात. सायन्स, क्राफ्ट, डान्स, फूड, कॉमेडी इत्यादी. म्हणूनच तर एकदा का आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आलो की आपला वेळ कसा निघून जातो, हे आपलंच आपल्याल कळत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. आम्ही असं का म्हणतोय? हे तुम्हाला व्हिडीओ पाहूनच कळेल. तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल की, लोक घाईघाईने ट्रेन पकडतात किंवा ट्रेन सुटेल म्हणून रेल्वे रुळ ओलांडतात. परंतु या व्हिडीओत महिलेनं जे केलं आहे, ते फारच धोकादायक आहे. हो कारण ही महिला ट्रेनमध्ये न चढता ट्रेनच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करत आहे. जे खूपच धोकादायक आणि कायद्याने चुकीचे आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बांगलादेशचा आहे, ज्यात एक महिला ट्रेनच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पाहा व्हिडीओ : Viral video : प्रसिद्धीसाठी Reels काढणाऱ्या तरुणाची एक चूक, त्याला भलतीच महागात पडली ट्रेनच्या आतच नव्हे तर ट्रेनच्या छतावरही अनेक लोक बसलेले दिसतात. ट्रेनमध्ये जागा नसल्यामुळे या व्हिडीओमधील महिलेलाही ट्रेनच्या छतावर बसायचे आहे, त्यासाठी ती खूप मेहनत करते, ट्रेनच्या खिडकीवर चढते, छतावरील लोक तिला वर खेचण्यासाठी मदत देखील करतात. परंतु काहीही केल्या या महिलेला ट्रेनच्या छतावर चढणं शक्य होत नाही.
तेवढ्यात पोलीस देखील त्या ठिकाणावर येतात आणि महिलेला काठीने मारण्यासाठी धावतात. तेवढ्यात ही महिला खाली उतरते. पाहा व्हिडीओ : झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला चपलेने मारहाण; महिलेचा Video समोर आल्यानंतर नागरिक संतप्त हा ट्रेंडिंग व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला तीन लाखांहून अधिक लोकांनी लाइकही केलं आहे.