नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला झोमॅटो फूड डिलिवरी बॉयला चपलेने मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा डिलिव्हरी बॉय ऑर्डर देण्यासाठी जात होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी महिलेविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. क्लिपमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉय गप्प उभा असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ 16 ऑगस्टचा असल्याचं सांगितलं जात आहे. ट्विटरवर dj नावाच्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने दावा केला आहे की, डिलिव्हरी पार्टनर माझी ऑर्डर घेऊन येत होता. Amazon Delivery बॉय असा झाला कोट्यवधींचा मालक, आधी खायलाही नव्हते पैसे आता फिरतो 2 कोटींच्या गाडीत त्यावेळी कोणी महिलेने त्याच्याकडून ऑर्डर घेतली आणि त्याला चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली. नोकरी गमावू या भीतीने त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी महिलेविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. एकाने लिहिलं आहे की, महिला त्याला अशी वागणूक का देत आहे. याबाबत तिच्याविरोधात कारवाई करायला हवी.