JOIN US
मराठी बातम्या / Viral / Air India ने बोर्डिंगसाठी दिला नकार; महिलेला विमानतळावरच आला पॅनिक अटॅक, Shocking Video

Air India ने बोर्डिंगसाठी दिला नकार; महिलेला विमानतळावरच आला पॅनिक अटॅक, Shocking Video

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Indira Gandhi International Airport) आत बोर्डिंग गेटजवळ पॅनिक अटॅक (Panic Attack on Airport) आल्यानंतर एक महिला बेशुद्ध झाली

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 13 मे : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Indira Gandhi International Airport) आत बोर्डिंग गेटजवळ पॅनिक अटॅक (Panic Attack on Airport) आल्यानंतर एक महिला बेशुद्ध झाली. एअर इंडिया एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी उशीर झाल्याचा दावा करून महिलेला विमानात बसण्यासाठी जाऊ दिलं नाही. इन्स्टाग्राम यूजर विपुल भीमानी याने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एअरलाइनने अधिकृत निवेदनात याला ‘दिशाभूल करणारं’ म्हटलं आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये, विपुल भीमानी म्हणजेच महिलेच्या पुतण्याने दावा केला आहे की तो त्याच्या चुलतीसोबत होता. ती हार्ट आणि मधुमेहाची रुग्ण आहे आणि त्याच्या चुलत भावाला 5 मे रोजी एअर इंडियाच्या फ्लाइट 823 ने ते दोघंही प्रवास करणार होते. सकाळी 4.45 वाजता फ्लाइट निघणार होती. त्यांनी आरोप केला की सुरक्षा तपासणीमध्ये काही तांत्रिक समस्येमुळे तीन जणांना बोर्डिंग करण्यास उशीर झाला आणि ते पहाटे 4.27 वाजता बोर्डिंग गेटवर पोहोचले. जिवंतपणी नरकयातना! कोरोना रुग्णासोबत भयंकर कृत्य; संतापजनक VIDEO समोर त्याने पोस्टमध्ये लिहिलं की, ‘आमच्यासोबत हार्ट आणि मधुमेहाची एक महिला रुग्ण होती. परिस्थिती जाणून घेऊन, आम्ही एअर-इंडियाच्या कर्मचाऱ्यांना चेक-इन पॉइंटवर चालू असलेल्या तांत्रिक समस्येवर तोडगा काढत मदत करण्यासाठी आधीच कळवलं होतं. मात्र, सुरक्षा तपासणीचा मुद्दा आमच्या कामाचा भाग नाही असं सांगून आम्हाला आम्हाला कोणतीही मदत नाकारली.’

संबंधित बातम्या

भीमानी यांनी पुढे असा दावा केला की जेव्हा सुरक्षा तपासणी पूर्ण केली तेव्हा त्यांनी एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांना कळवलं की ते पाच मिनिटांत बोर्डिंग गेटवर पोहोचतील कारण त्यांच्यासोबत हार्ट आणि मधुमेहाचा रुग्ण आहे. मात्र तरीही एअरलाइनने बोर्डिंग गेट बंद केलं आणि त्यांना आत सोडण्यास नकार दिला. महिलेच्या मुलाची त्याच दिवशी शेवटची परीक्षा होती. त्यामुळे तिला पॅनिक अटॅक आला आणि ती बेशुद्ध झाली. सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की मेडिकस कंडीशन असूनही एअरलाइनने महिलेला वैद्यकीय मदत देण्याऐवजी विमानतळातून बाहेर जाण्यास सांगितलं. एअर इंडियाच्या अधिकृत निवेदनानुसार, बोर्डिंग गेट बंद झाल्यानंतर महिलेने आणि सोबतच्या दोन प्रवाशांनी याची माहिती दिली. त्यांना अनेकदा याबाबत तक्रार करण्यासाठी बोलावलं गेलं होतं. पुढे एअरलाइन्सने सांगितलं की महिला खाली कोसळल्यानंतर एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांनी डॉक्टर आणि CISF-ISF कर्मचार्‍यांना ताबडतोब बोलावलं होतं. परंतु जेव्हा डॉक्टर घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी कोणतीही वैद्यकीय मदत किंवा व्हीलचेअर नाकारली, कारण त्यांना आधीपेक्षा बरं वाटू लागलं होतं. Shocking Video! लग्न होताच नवरा-नवरीने स्वतःला पेटवून घेतलं; पाहुणे मात्र पाहून हसू लागले एअरलाइन्सने सांगितलं की “दिल्ली विमानतळावर एअर इंडियाची प्रवासी खाली कोसळल्याची घटना दर्शविणारा एक व्हिडिओ विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जात आहे. गेटजवळ पडलेल्या प्रवाशाला एअर इंडिया मदत करत नसल्याची दिशाभूल करणारी प्रतिमा यातून दाखवली जात आहे.” एअरलाइन्सने अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, ‘एअर इंडिया नेहमीच प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि सोईला सर्वोच्च प्राधान्य देतं. एक जबाबदार विमान कंपनी म्हणून आम्ही नियामक प्राधिकरणांनी घालून दिलेल्या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही फ्लाइटच्या उड्डाणाला उशीर करू शकत नाही. विशेषत: जेव्हा सर्व प्रवासी वेळेवर पोहोचले असतील.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या