Home /News /viral /

जिवंतपणी नरकयातना! कोरोना रुग्णासोबत भयंकर कृत्य; संतापजनक VIDEO समोर

जिवंतपणी नरकयातना! कोरोना रुग्णासोबत भयंकर कृत्य; संतापजनक VIDEO समोर

कोरोना रुग्णाचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

    बीजिंग, 12 मे : कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढू लागली आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने आता प्रशासनही हादरलं आहे. प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहे. काही दिवसांपूर्वीच जबरदस्ती कोरोना टेस्ट केली जात असल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. आता कोरोना रुग्णांचा भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. कोरोना रुग्णांचा असा छळ केला जातो आहे की त्यांना जिवंतपणीच नरकयातना दिल्या जात आहेत, असंच हा व्हिडीओ पाहून वाटेल (Corona patient shocking video). कोरोना रुग्णांना पोलीस एखाद्या वस्तूसारखं टेपमध्ये गुंडाळत आहेत. जिवंतपणीच त्यांना ममीसारखं बनवलं जात आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे (Police catching covid patients by applying tape). व्हिडीओत पाहू शकता पीपीई कीट घातलेले हे पोलीस आहेत. त्यांनी एका व्यक्तीला पकडलं आहे. ही व्यक्ती कोरोना रुग्ण आहे. या व्यक्तीचे हात आणि पाय पकडून तिला बांधलं जात आहे. तिच्याभोवती टेप गुंडाळली जाते आहे. एखाद्या बॉक्सभोवती किंवा वस्तूला टेप लावाली तशी टेप या व्यक्तीभोवती लावली जाते आहे. एका महिलेचा ओरडण्याचा आवाजही या व्हिडीओत येतो आहे. असं कृत्य करताना पोलिसांना काहीच वाटत नाही आहे. त्यांच्यातील माणुसकी मेलीच असंच दिसून येतं आहे. ज्याला ते गुंडाळत आहेत, तो एक जिवंत माणूस आहे, याचाही त्यांनी विचार केला नाही. हे वाचा - Shocking Video! लग्न होताच नवरा-नवरीने स्वतःला पेटवून घेतलं; पाहुणे मात्र पाहून हसू लागले @ChinaUncensored ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ चीनमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. नेटिझन्सनी यावर संताप व्यक्त केला आहे. याला ममी बनवलं जात आहे का? असा कोरोना कसा संपवणार? अशा कमेंट नेटिझन्सनी केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच चीनमधीलच असा कोरोना टेस्टचाही संतापजनक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात एका महिलेला जमिनीवर आडवं पाडून तिची जबरदस्ती कोरोना टेस्ट केली जात होती. हे वाचा - बापरे! वरात आहे की त्सुनामी; जेवणाऱ्या काऊंटरच्या दिशेने धावत सुटले पाहुणे, Video Viral व्हिडीओत पाहू शकता एक महिलेला जमिनीवर आडवं पाडण्यात आलं आहे. दोन व्यक्ती तिची जबरदस्ती कोरोना टेस्ट करत आहे. एक पुरुष तर तिच्या शरीरावरच बसला आहे. त्याने तिचे हातही दाबून धरले आहेत. तिचं नाक आणि तोंड उघडलं आहे आणि दुसरी पीपीई किट घातलेली व्यक्ती हातात स्वॅब घेऊन त्या महिलेच्या नाकात टाकते आणि तिचा सॅम्पल घेते. महिला त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करते आहे. पण तिला ते शक्य होत नाही आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: China, Viral, Viral videos

    पुढील बातम्या