JOIN US
मराठी बातम्या / Viral / आईनेच केला पोटच्या मुलांच्या जीवाशी खेळ, कॅमेऱ्यात कैद झालं धक्कादायक दृश्य; VIDEO VIRAL

आईनेच केला पोटच्या मुलांच्या जीवाशी खेळ, कॅमेऱ्यात कैद झालं धक्कादायक दृश्य; VIDEO VIRAL

एका आईने स्वतःसह आपल्या मुलांचा जीव धोक्यात टाकला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

मुलांसह आईचा जीवघेणा खेळ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : आपल्या मुलांना साधं खरचटलं तरी त्याच्या जखमा आईच्या हृदयावर होतात. आपल्या मुलांवरील येणारं संकट आई स्वतःवर ओढावून घेते किंवा त्या संकटातून आपल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावते. पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात एका आईने स्वतःच आपल्या पोटच्या मुलांच्या जीवाशी खेळ केला आहे. हे धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. वाघ, बिबट्या अशा हिंस्र प्राण्यांच्या जबड्यातूनही आपल्या मुलांना वाचवणारी आहे. मृत्यूच्या दारातूनही आपल्या मुलांना खेचून आणणारी आई. पण या व्हिडीओतील आईने मात्र आपल्याच मुलांना मृत्यूच्या दारात नेलं असं म्हणावं लागेल. स्वतःसह तिने आपल्या मुलांचाही जीव धोक्यात टाकला आहे. हे वाचा -  VIDEO - 16 सेकंदात 2 वेळा समोर आला मृत्यू; या ‘सुरक्षाकवच’मुळे वाचला तरुण व्हिडीओत पाहू शकता महिला एका गाडीत दिसते आहे. या गाडीत तिच्यासोबत तिची दोन लहान मुलंही आहेत. रस्त्यावरून ती भरधाव गाडी चालवत येत असताना समोर एक गेट लागतो. आता यावेळी महिलेने गाडीला ब्रेक मारून थांबणं गरजेचं होतं. पण महिला रस्त्याच्या कडेला आपली गाडी नेते ती तिरकी करून त्या गेटच्या मध्यभागी असलेल्या थोड्याशा जागेतून काढण्याचा प्रयत्न करते.

गाडीत मुलं असताना ती असा स्टंट करण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी गेटच्या वरील भागाला तिच्यासह तिच्या मुलांचं डोकं आपटतं. तिचं लहान मूल आणि ती गाडीतून बाहेर पडतात आणि दुसरं मूल चालत्या गाडीत तसंच पुढे जातं. त्याचवेळी अक्षरशः आपल्या काळजाचा ठोका चुकतो.

संबंधित बातम्या

इतक्या भरधाव गाडीतून महिला पडते की ती जमिनीवर पडल्यानंतर तिला उठणंही शक्य होत नाही. आपल्यासोबत पडलेल्या मुलाकडे ती पाहते आणि त्याच्यादिशेने हात करते. सुदैवाने ते मूल कसंबसं उठतं आणि स्वतःच चालत आपल्या आईजवळ जातं आणि काही वेळाने गाडीत पुढे गेलेलं तिचं दुसरं मूलही तिच्या जवळ आलेलं दिसतं. हे वाचा -  भरधाव वेगाने आलेल्या बाईक चालकाने विद्यर्थिनीला फुटबॉल सारखंच उडवलं, VIDEO VIRAL हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा माहिती नाही. @IdiotsNearlydyi ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या 26 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पण पाहून काळजाचा ठोका चुकवणार आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट आहेत. मुलं ठिक असल्याचं पाहून सर्वांच्या जीवात जीव आला आहे. तर महिलेच्या अशा कृत्याबाबत संताप व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या