JOIN US
मराठी बातम्या / Viral / प्लास्टिक सर्जरीसाठी पतीचे कोट्यवधी उडवले; या कारणामुळे शेवटी महिलेवर आली पॉर्न स्टार होण्याची वेळ

प्लास्टिक सर्जरीसाठी पतीचे कोट्यवधी उडवले; या कारणामुळे शेवटी महिलेवर आली पॉर्न स्टार होण्याची वेळ

स्वत: बार्बी डॉलसारखं दिसण्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करणाऱ्या या महिलेला एके दिवशी चटईवर झोपावं लागेल, असं कधीच वाटलं नसेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 08 एप्रिल : नशीब कधी आणि कसं पटलेट हे सांगता येत नाही. कधीकधी हे नशीब अगदी क्षणात एखाद्या राजाला भिकारी बनवतं तर कधी एखाद्या गरीबाला करोडपती बनवतं. अशा अनेक घटना तुम्ही ऐकल्या आणि वाचल्या असतील, ज्यामध्ये नशिबाच्या खेळाने माणसाचं आयुष्य बदलून टाकलं. अशाच एका तरुणीची कहाणी आता समोर आली आहे. स्वत: बार्बी डॉलसारखं दिसण्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करणाऱ्या या महिलेला एके दिवशी चटईवर झोपावं लागेल, असं कधीच वाटलं नसेल. होय, या महिलेला तिच्या पैशाच्या उधळपट्टीबद्दल आता नक्कीच वाईट वाटत असेल. पती कामासाठी परदेशात, पत्नीने 3 कोटींची लॉटरी जिंकली अन् थाटला दुसरा संसार आम्ही नॅनेट हॅमंड लॉसचियावोबद्दल बोलत आहोत. नॅनेटला नेहमीच बार्बी डॉलसारखं दिसायचं होतं. यासाठी तिने खूप पैसा खर्च केला. नॅनेटने केवळ प्लास्टिक सर्जरीवर सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च केले आहेत. गेल्या 17 वर्षांत तिने कधीही कसलंही बिल भरलं नव्हतं. यासोबतच ती चार वाहनांतून पतीच्या आलिशान बंगल्यात फिरत असे. पण आज तिला एका छोट्या फ्लॅटमध्ये खाली चटईवर घालवावी लागत आहे. तिच्याकडे फर्निचर घेण्यासाठीही पैसे नाहीत. नॅनेट तिच्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर कठीण काळातून जात आहे. पण 6 मुलांची आई हार मानणार नाही. नुकतंच तिने अॅडल्ट साइट OnlyFans जॉईन केलं आहे. डेली स्टारशी संवाद साधताना तिने सांगितलं की घटस्फोटाच्या एका वर्षात तिचं आयुष्य खूप बदललं आहे. वर्षभरापासून तिने स्वतःवर कसलाच खर्च केलेला नाही.

तिने वर्षभरापासून बोटॉक्सचे इंजेक्शनही घेतले नव्हते. तिचा नवरा तिच्या सर्व गरजा पूर्ण करत असे. मात्र घटस्फोटानंतर तिने अनेक रात्री रस्त्यावर काढल्या आहेत. पण लवकरच तिची परिस्थिती सुधारेल आणि तिला पुन्हा नवी शस्त्रक्रिया करता येईल, असा विश्वास तिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या