JOIN US
मराठी बातम्या / Viral / काहीही! थुंकी, कानाचा मळ आणि नको तेच...; शरीरातील घाण विकून लाखो रुपयांची कमाई

काहीही! थुंकी, कानाचा मळ आणि नको तेच...; शरीरातील घाण विकून लाखो रुपयांची कमाई

शरीरातील घाण आणि वापरलेल्या वस्तू विकून आपण लखपती झाल्याचा दावा एका महिलेने केला आहे.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 13 एप्रिल : नखं वाढली की ती आपण कापतो, कानात मळ साचला की तो काढून टाकतो, शरीरावर केस आले की तेसुद्धा काढतो. आपल्यासाठी ही शरीरातील घाण, त्यामुळे आपण ते फेकून देतो. पण शरीराच्या याच घाणीपासून पैसेही कमवता येतात, असं तुम्हाला सांगितलं तर… आश्चर्य वाटलं ना? किंबहुना विश्वासही शरीरातील घाण आणि तिने वापरलेल्या वस्तू विकूनच ती लखपती बनली आहे. बसत नसेल. पण एक महिला शरीराच्या अशाच घाणीपासून लाखो रुपये कमवते आहे. अमेरिकेतील एका महिलेच्या कमाईचा हा विचित्र मार्ग चर्चेत आला आहे. रेबेका ब्लू असं या महिलेचं नाव आहे. ती नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहते. रेबेका ज्या पद्धतीने पैसे कमवते, त्याचा आपण कधी स्वप्नातही विचार करणार नाही. शरीरातील घाण आणि तिने वापरलेल्या वस्तू विकूनच ती लखपती बनली आहे.

रेबेका सुरुवातीला आपली थुंकी विकत होती. त्यावर तिचं समाधान झालं नाही, त्यामुळे तिने वापरलेली कॉपर टी ऑनलाईन विकली. आता तर ती त्वचेवरील काढलेले केस, पायांची कापलेली नखं, कानातील मळसुद्धा विकते. तिने त्वचेवरील केस, वापरलेले अंडविअर, मोजे, पँटीलायनर, फेस मास्क कॉटन स्वॅपही विकले आहेत. या क्युट पक्ष्यांना स्पर्श करताच होऊ शकतो तुमचा मृत्यू; चुकूनही जवळ जाऊ नका नुकत्याच एका व्हिडीओत तिने पायांची नखं, 300 डॉलर्समध्ये विकल्याचं सांगितलं. तिच्या मते, लोक तिचं अंघोळीचं पाणी, टॉयलेट स्क्रबर्स, फ्लिप फ्लॉप, मेकअप वाईप यासाठी 250 डॉलर्स खर्च करायला तयार आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण असं काहीही विकून तिला महिन्याला 2000 डॉलर म्हणजे तब्बल  1.63 लाख रुपये ती कमावते, असा दावा तिने केला आहे.  डेली मेलच्या वृत्तानुासर needtucno.uk ला तिनं सांगितलं, मी आतापर्यंत विकलेली सर्वात महागडी गोष्ट म्हणजे एक IUD ज्याने हजारो डॉलर्स मिळवले. रेबेका अनेकदा तिच्या सोशल मीडिया टिकटॉवक अकाऊंटवर ती काय विकते, याचे व्हिडीओ पोस्ट करते आणि आपल्या इतरांनाही ते विकण्यासाठी प्रोत्साहित करते. टॉयलेट सीटपेक्षा जास्त घाण मेकअप ब्रशमध्ये, तज्ञांनी काय सांगितलं पाहा काहीही निरुपयोगी नाही, सर्वकाही मौल्यवान आहे. आपल्याला फक्त त्याचे मूल्य कसे द्यावे हे माहित असणे आवश्यक आहे, असं ती म्हणाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या