JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : रिल बनवण्यासाठी महिलेनं जीव टाकला धोक्यात, रेल्वे ट्रॅकवर उतरली आणि...

Viral Video : रिल बनवण्यासाठी महिलेनं जीव टाकला धोक्यात, रेल्वे ट्रॅकवर उतरली आणि...

आजकाल लोक सोशल मीडियावर जास्त वेळ घालवताना दिसतात. लोक फोटो, व्हिडीओ बनवत ते इंटरनेटवर शेअर करतात. त्यामुळे दिवसेंदिवस सोशल मीडियाचं क्रेझ वाढत आहे.

जाहिरात

रिल बनवण्यासाठी महिलेनं जीव टाकला धोक्यात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 जुलै: आजकाल लोक सोशल मीडियावर जास्त वेळ घालवताना दिसतात. लोक फोटो, व्हिडीओ बनवत ते इंटरनेटवर शेअर करतात. त्यामुळे दिवसेंदिवस सोशल मीडियाचं क्रेझ वाढत आहे. लोक प्रसिद्धीसाठी काहीही करताना दिसतात. आपला जीवही धोक्यात घालायला कमी करत नाही. यामध्ये लहानापांसून मोठ्यांपर्यंत सर्वच सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. असाच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एका महिला रील बनवण्यासाठी चक्क रेल्वे ट्रॅकवर उतरली. एक महिला सोशल मीडियासाठी रिल बनवत होती. रिलसाठी ती रेल्वे ट्रॅक उतरलेली दिसून आली. तरुणीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होताच पोलिसांनी याची दखल घेत कारवाई केली.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी रील बनवत आहे. या रिलसाठी महिला थेट रेल्वे ट्रॅकवरच उतरली. जीवाची पर्वा न करता ती ‘अब तेरे बिन हम भी जी लेंगे’ या गाण्यावर रिल बनवत आहे. महिला डान्स करत असताना तिची मुलगी तिचा व्हिडिओ बनवत होती. ही घटना आग्रा फोर्ट रेल्वे स्थानकातून समोर येत आहे. मीना सिंह असं महिलेचं नाव आहे. मीनाने तिचा व्हिडिओ यूट्यूब शॉट्सवर अपलोड केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आई-मुलीची ओळख पटवली आणि त्यांना ताब्यात घेतलं. पुढच्या वेळी असे करणार नाही, असं आश्वासन दोघांनी दिल्यावर पोलिसांनी त्यांना जामीन मंजूर केला.

संबंधित बातम्या

दरम्यान, लोक सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी काहीही करतात. यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये लोकांनी फोटो, व्हिडीओसाठी धोकादायक ठिकाणं निवडली. अनेकांसोबत हे करत असताना दुखापतही झालेली समोर आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या