JOIN US
मराठी बातम्या / Viral / बॉयफ्रेंडसोबत 5 स्टार हॉटेलमध्ये गेली तरुणी; जेवणाचा फोटो अन् किंमत पाहून बसेल धक्का

बॉयफ्रेंडसोबत 5 स्टार हॉटेलमध्ये गेली तरुणी; जेवणाचा फोटो अन् किंमत पाहून बसेल धक्का

हे तर सर्वांनाच माहिती आहे की मोठ्या हॉटेलमध्ये खाण्या पिण्याच्या गोष्टींची किंमत खूप जास्त (Food Cost in 5 Star Hotel) असते. मात्र, सध्या व्हायरल (Viral Tweet) होणारा फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 29 ऑगस्ट : जर तुम्हाला खाण्या-पिण्यााची आणि फिरण्याची आवड असेल तर अगदी स्ट्रीट फूडपासून (Street Food) 5 स्टारसारख्या महागड्या हॉटेलमधील (Hotel) मेन्यूही तुम्हाला चांगलेच माहिती असतील. लंडनमधील एका महिलेनं सोशल मीडियावर आपल्यासोबत झालेल्या अशाच एका फसवणुकीची घटना सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली आहे. ही घटना वाचून तुम्हीही हैराण व्हाल. हे तर सर्वांनाच माहिती आहे की मोठ्या हॉटेलमध्ये खाण्या पिण्याच्या गोष्टींची किंमत खूप जास्त (Food Cost in 5 Star Hotel) असते. मात्र, सध्या व्हायरल (Viral Tweet) होणारा फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पतीनं खात्यात जमा केले 39 लाख रुपये; पैसे घेऊन प्रियकरासोबत फरार झाली पत्नी रवीना नावाची एक महिला आपल्या बॉयफ्रेंडसोबत लंडनच्या पंचतारांकित हॉटेल ‘द शार्ड’मध्ये डेटवर गेली होती. दोघांनी जेव्हा जेवण ऑर्डर केलं तेव्हा प्लेट पाहून ते हैराण झाले. त्यांनी जेवण ऑर्डर केलं होतं. मात्र, त्यांना चिकनचा छोटा तुकडा, एक बटाटा आणि ब्राउन सॉस दिला गेला. व्हायरल फोटोमध्ये दिसणारं हे इतकंस जेवण तब्बल 3 हजार रुपयांचं होतं. मुलीच्या आनंदासाठी आईनं घेतला मोठा निर्णय; 53 व्या वर्षी स्वतः दिला नातीला जन्म प्लेटमध्ये आलेलं जेवण पाहून महिलेचं भडकणं सहाजिकच होतं. महिलेनं आपल्या राग ट्विटरच्या माध्यातून व्यक्त केला आणि आपल्या फॉलोअर्सलाही याबद्दल सांगितलं. रवीना नावाच्या या महिलेनं कमेंट्समध्ये पुढे हेदेखील लिहिलं, की थोड्याशा फ्राईजसाठी तिला आणखी पाच यूरो द्यावे लागले. इतक्या कमी पदार्थांसाठी महिलेला द्यावी लागलेली ही किंमत ऐकून नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या