JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Photo: 20 रुपयांच्या मॅगीसाठी महिलेनं मोजले ‘इतके’ पैसे, बिल पाहून नेटकरीही अवाक

Viral Photo: 20 रुपयांच्या मॅगीसाठी महिलेनं मोजले ‘इतके’ पैसे, बिल पाहून नेटकरीही अवाक

मॅगीचे टोटल बिल 193 रुपये झाले. बिलात रिसीट नंबर आणि बिलाची तारीखही दिसतेय.

जाहिरात

मॅगीचं बिल पाहून नेटकरीही अवाक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 18 जुलै : सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या फूड फ्युजनचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. याशिवाय बऱ्याचदा एखादी स्वस्त वस्तू महाग खरेदी करावी लागली असेल किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त व अवाजवी बिल आलं असेल तरी नेटकरी ते बिल सोशल मीडियावर शेअर करून अनुभव सांगतात. काही दिवसांपूर्वी मल्टिप्लेक्समधील पॉपकॉर्न आणि कोल्ड ड्रिंकचं बिल चांगलंच व्हायरल झालं होतं. त्यानंतर आता मसाला मॅगीचं बिल व्हायरल होत आहे. या संदर्भात ‘एनडीटीव्ही’ने वृत्त दिलंय. नुकतंच एका महिलेनं एअरपोर्टवरून खरेदी केलेल्या मॅगीच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो चांगलाच व्हायरल होत आहे, या बिलात मॅगीची किंमत 193 रुपये लिहिली आहे. सध्या एका यूट्युबरचं ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे, त्यामागचं कारण 2 मिनिटांत बनणाऱ्या मॅगी नूडल्सचं बिल आहे. सेजल सूद (@SejalSud) नावाच्या युजरने तिच्या ट्विटर हँडलवरून मॅगीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

संबंधित बातम्या

मॅगीच्या बिलाचा फोटो शेअर करत तिने पोस्टमध्ये लिहिलं, ‘मी नुकतीच एअरपोर्टवर 193 रुपयांना मॅगी विकत घेतली आणि मला समजत नाही की काय प्रतिक्रिया द्यावी, कोणी मॅगी इतकी महाग का विकेल?’ तिने 16 जुलै रोजी शेअर केलेली ही पोस्ट आतापर्यंत 1.1 मिलियन लोकांनी पाहिली आहे, तर 3 हजारांहून अधिक लोकांनी या पोस्टला लाईक केलं आहे. विहीर गेली चोरीला! बांधली कधी हे शेतकऱ्यालाच माहित नाही, प्रकरण पोहोचलं हायकोर्टात या व्हायरल पोस्टमध्ये मसाला मॅगीची किंमत 184 रुपये असल्याचे दिसते. त्याच वेळी, त्यावर एकूण 9.20 रुपये जीएसटी लावण्यात आला आहे. अशा परिस्थितीत मॅगीचे टोटल बिल 193 रुपये झाले. बिलात रिसीट नंबर आणि बिलाची तारीखही दिसतेय. व्हायरल बिलवरील मॅगीची किंमत पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पोस्टवर युजर्स विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. काही युजर्सनी ‘मॅगी इतकी महाग का विकली जात आहे’? असं विचारलं आहे. तर एका युजरने लिहिलं, ‘तुम्ही गरीब आहात का? घरून खायला न्या’. दरम्यान, काही युजर्सनी एअरपोर्टवरील पदार्थांच्या किमतीत तफावत असल्याचं म्हटलंय. ‘तुम्ही एखाद्या स्टॉलवर मॅगी खाल आणि एअरपोर्टवर खाल तर फरक असणारचं’, असं एकाने म्हटलंय. तर ‘ही मॅगी विमानाच्या इंधनापासून बनवली आहे’, अशी कमेंट एकाने केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या