JOIN US
मराठी बातम्या / Viral / 5 दिवसात 2 वेळा गरोदर राहिली महिला; डिलिव्हरीवेळी मात्र भलतंच घडलं, अजब प्रकरण समोर

5 दिवसात 2 वेळा गरोदर राहिली महिला; डिलिव्हरीवेळी मात्र भलतंच घडलं, अजब प्रकरण समोर

ही महिला अवघ्या ५ दिवसात २ वेळा गरोदर झाली (Woman got Pregnant Twice in a Week). म्हणजेच प्रेग्नंट महिला पुन्हा एकदा प्रेग्नंट झाली (Weird Case of Pregnancy).

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 01 मार्च : मानवी शरीर (Human Body) अतिशय अजब आहे. यावर कितीही अभ्यास केला, तरी काही अशाही गोष्टी समोर येतात, ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसते. नुकतंच अमेरिकेतील एका महिलेसोबतही असंच घडलं. ज्याबद्दल ऐकून सगळेच थक्क झाले. ही महिला अवघ्या ५ दिवसात २ वेळा गरोदर झाली (Woman got Pregnant Twice in a Week). म्हणजेच प्रेग्नंट महिला पुन्हा एकदा प्रेग्नंट झाली (Weird Case of Pregnancy). MBBS च्या विद्यार्थ्याने कॉपीसाठी सर्जरी करून याठिकाणी बसवलं Bluetooth Device ही बातमी वाचून तुम्हीही विचारात पडला असाल. हा चमत्कार नेमका कसा घडला, असा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला असेल. मिरर वेबसाईटच्या वृत्तानुसार, कॅलिफोर्नियाच्या सेन पाबलोमध्ये राहणारी ओडालिस आणि तिचा पार्टनर एटोनियो अतिशय आनंदात होते, जेव्हा त्यांना समजलं की ओडालिस गरोदर आहे आणि पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. 2020 साली तिचा गर्भपात झाला होता. अशात नोव्हेंबर 2020 मध्ये ती पुन्हा गरोदर राहिल्याने दोघेही अतिशय आनंदी होते.

25 वर्षी ओडालिसने जेव्हा पहिल्यांदा आपलं स्कॅन केलं तेव्हा मात्र ती हैराण झाली. कारण ती एक नाही तर दोन मुलांची आई होणार होती. विशेष बाब म्हणजे ही दोन्ही मुलं एकाच वेळी कन्सीव झाली नव्हती. ते दोघंही एकाच आठवड्यात वेगवेगळ्या दिवसी कन्सीव झाले होते. ही अतिशय दुर्मिळ आणि विचित्र बाब आहे, जी फक्त 0.3 टक्के महिलांसोबतच घडते. अनेक डॉक्टरांचं तर असंही म्हणणं आहे की माणसांमध्ये हे होणंच अशक्य आहे. महिलेला आपल्याच घरात दिसला सिक्रेट दरवाजा; आतमधील दृश्य पाहून झाली थक्क स्कॅनदरम्यान डॉक्टरांनी महिलेला सांगितलं की तिची मुलं जुळी नाहीत. ते पाच दिवसांच्या अंतराने कन्सीव झाले आहेत. महिलेनं सांगितलं की तिची डिलिव्हरी डेट दोन्ही मुलांच्या मध्ये ठेवली गेली. म्हणजेच एका बाळाचे ४० आठवडे झाल्यावर २ दिवसांनी आणि दुसऱ्याची ४० आठवडे होण्याच्या दोन दिवस आधीच डिलिव्हरी केली गेली. 10 ऑगस्ट 2021 ला ही बाळं जन्मली. मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना टेक्निकली जुळी मुलं म्हणता येणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या