लग्नात आलेल्या मित्राच्याच प्रेमात पडली तरुणी (प्रतीकात्मक फोटो)
नवी दिल्ली 16 जून : ब्रिटनमधील रहिवासी असलेल्या केरी स्विंटनने जून 2011 मधील लग्न समारंभ आपलं आयुष्य बदलून टाकेल, असा विचारही केला नव्हता. तिने लग्नासाठी 110 पाहुण्यांना आमंत्रित केलं होतं. इथे तिची भेट 20 वर्षीय मार्क टेलरशी झाली. त्यावेळी तिला माहिती नव्हतं, की एक दिवस ही व्यक्ती तिचा जोडीदार बनेल आणि एक दिवस ती त्याचा जीव वाचवेल. चार वर्षांनंतर केरीचं लग्न मोडलं आणि ती आपल्या मुलीसोबत एकटी राहू लागली. दरम्यान, तिचा पियानो घेऊन जाण्यासाठी ती व्हॅन शोधत होती, तेव्हाच फेसबुकवर मार्क टेलरची कंपनी तिला दिसली. हळूहळू दोघांचं मेसेजवर बोलणं होऊ लागलं. मार्कला माहीत होतं की तिचं लग्न झालं आहे, त्यामुळे त्याला फारसं जवळ यायचं नव्हतं. पण बोलताना केरीने सांगितलं, की ती आता एकटीच राहत आहे. केरीने सांगितलं - ‘मला मार्क नेहमीच आवडायचा, पण 55 वर्षांचा असूनही तो अविवाहित आहे हे मला माहीत नव्हतं. आम्ही रोज खूप बोलायचो. एके दिवशी तो अचानक फुलांचा गुच्छ घेऊन आला आणि मला डेटवर येण्यासाठी विचारलं. मी नकार देऊ शकले नाही. त्यानंतर आम्ही दोघे एक झालो. मला अजूनही विश्वास बसत नाहीये, की ज्या व्यक्तीला मी माझ्या लग्नात भेटले होते, त्याच्यासोबत आता मी लग्न करणार आहे’ नववधू लपतछपत मंडपाबाहेर आली, थेट पळत सुटली; रस्त्यातच अख्खा लेहेंगा काढला आणि… ती पुढे म्हणाली, ‘दरम्यान एक विचित्र घटना घडली. मार्कला पॉलीसिस्टिक किडनी या अनुवांशिक आजाराचं निदान झालं. त्याची किडनी निकामी झाली. नाकातून सतत रक्त येत होतं. डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणासाठी सांगितलं. मी लगेच म्हणाले, की तुम्ही माझी किडनी घेऊ शकत असाल तर लगेच घ्या. डॉक्टर म्हणाले - ती मॅच होणे आवश्यक आहे. मी खूप काळजीत होते. मात्र तपासणीनंतर डॉक्टर म्हणाले - हे एक परफेक्ट मॅच आहे. म्हणजे माझी किडनी त्याच्यावर प्रत्यारोपण होऊ शकते. मी खूप आनंदी होते. माझ्या लग्नात भेटलेला माणूस माझ्यासाठी परफेक्ट मॅच असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझ्या अवयवासोबत तो पूर्ण आयुष्य जगेल. सुदैवाने सर्जरी यशस्वी झाली’