JOIN US
मराठी बातम्या / Viral / कसं शक्य आहे? ड्रायव्हरशिवायच चालू लागली Rickshaw; विश्वास बसत नसेल तर पाहा हा VIDEO

कसं शक्य आहे? ड्रायव्हरशिवायच चालू लागली Rickshaw; विश्वास बसत नसेल तर पाहा हा VIDEO

ड्रायव्हरशिवाय चालणारी ही ई-रिक्षा पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 मार्च : गाडी म्हटलं की ड्रायव्हर आलाच. ड्रायव्हरशिवाय गाडी चालणं हे आपण बऱ्याच हॉरर किंवा हॉलिवूड फिल्ममध्ये पाहिलं असेल पण प्रत्यक्षात हे शक्य नाही. पण असा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्याच ड्रायव्हरशिवायच गाडी चालताना दिसली आहे. एक ई-रिक्षा ड्रायव्हरशिवायच अचानक धावताना दिसली. व्हिडीओ पाहूनच तुम्ही थक्क व्हाल (E-rickshaw running without driver) सोशल मीडियावर एका ई-रिक्षाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. ही घटना जर कॅमेऱ्यात कैद झाली नसती तर फक्त कुणीतरी सांगून पटलंच नसतं. किंबहुना व्हिडीओ स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनही विश्वास बसत नाही आहे. व्हिडीओत पाहू शकता, एक ई-रिक्षा रस्त्याच्या किनाऱ्यावर पार्क केली आहे. तिथून एक व्यक्ती चालते आहेत. व्यक्ती त्या रिक्षाजवळून जात असते. इतक्यात रिक्षा हलू लागतो. पार्किंगमध्ये असलेली रिक्षा अचानक सुरू होते.  सुरुवातीला रिक्षात कुणी आहे की नाही ते दिसत नाही. पण पुढे जाऊन रिक्षा एका भिंतीवर आपटतो आणि मागे वळतो. तेव्हा मात्र ड्रायव्हरच्या सीटवर कुणीच दिसत नाही. याचा अर्थ रिक्षात ड्रायव्हर नाही. ड्रायव्हरशिवायच ही रिक्षा चालू होते. हे वाचा -  एका हरणासाठी 6 सिंहांची आपसात झुंज! एकमेकांवर तुटून पडले अखेर…; VIDEO VIRAL रिक्षा भिंतीला आदळून मागे वळते आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाते. त्यावेळी तिथून जाणारी व्यक्तीही हे सर्व पाहून शॉक होते. ती व्यक्ती रिक्षाला हातांनी धरून थांबवण्याचा प्रयत्न करते. पण तरी रिक्षा काही थांबत नाही. एका कारजवळून ही रिक्षा वळते आणि पुन्हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाते. तिथं उभ्या असलेल्या कारजवळ दुसरी एक व्यक्ती उभी असते. तीसुद्धा ही रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करते. रिक्षा कारला आदळते आणि मग थांबते.

संबंधित बातम्या

हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स शॉक झाले आहेत. तुम्हालाही धक्का बसला असेल की ही रिक्षा ड्रायव्हरशिवाय आपोआप कशी काय चालू शकते, असाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल. हे वाचा -  VIDEO-वडिलांची नजर हटताच चिमुकल्याला घेऊन उडाला पक्षी; भयावह दृश्य कॅमेऱ्यात कैद यावर वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. काही जणांना हा व्हिडीओ मजेशीर वाटला तर काही जणांना भीतीदायक. काही युझर्सना हा व्हिडीओ पाहून मिस्ट इंडिया फिल्म आठवली आहे. हा फिल्ममधील डिलीट केलेला सीन असा असं म्हटलं आहे. तर कुणी गाडीला पेट्रोलचा नशा चढल्याचं म्हटलं आहे. कुणी या रिक्षाची तुलना टेस्लाशी केली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नेमकं काय वाटतं आहे. ही ई-रिक्षा अशी अचानक ड्रायव्हरशिवाय आपोआप चालण्यामागे नेमकं काय कारण असू शकतं, तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या