प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 10 मे : बाळाला जन्म देणं हे प्रत्येक पालकांसाठी आनंदाचा क्षण असतो. बाळाच्या रडण्याच्या आवाजाने सर्वाजण खूप खुश होतात. पण कधी विचार केलाय का की जन्माला आल्यानंतर बाळ का रडतात? यामागे एक खास कारण आहे. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. तज्ञ म्हणतात की जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा ते अशा वातावरणात प्रवेश करते ज्याचा त्याने यापूर्वी अनुभव घेतला नाही. यासह, त्यांच्या शरीरातील प्रणालींना सक्रिय होण्यासाठी ऑक्सिजन, पोषक आणि तापमान आवश्यक असते. त्यामुळे रडणे ही गरज व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. डॉक्टरांची एक चुक आणि वडिलांनी डोळ्यासमोर पाहिला आपल्या नवजात बाळाचा मृत्यू आरोग्य तज्ज्ञाच्या मते, मुलांना नवीन वातावरणात नवीन अनुभव येऊ लागतात आणि ते व्यक्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रडणे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की बाळ रडून त्यांच्या गरजा व्यक्त करू शकतात तसेच इतर पर्यावरणीय प्रतिसाद देखील दर्शवू शकतात. जसे की थंडी, उष्णता, आनंद, दुःख, भूक, थकवा, असंतुलन, भीती इ. नवजात मुलं वेगवेगळ्या कारणांसाठी रडून त्यांना हव्या असलेल्या गोष्टी दर्शवतात. तुम्ही हे पाहिलंच असेल की लहान मुलं ही भुकेमुळे रडतात आणि दूध पिऊन गप्प होतात. जन्मानंतर, तीन महिन्यांपर्यंत, बाळाला दर तासाला भूक लागते आणि भुकेबद्दल सांगायचे तर ते कमी आवाजात रडू लागतात. सहा महिन्यांनंतर, मुले स्वतःच झोपायला शिकतात परंतु काहीवेळा बाळांना त्यांच्या आई किंवा वडिलांशिवाय झोप येत नाही. ती लढली म्हणून जिवंत राहिली, सिंहिणींच्या कळपात सापडलेल्या म्हशीचा धक्कादायक प्रकार, पाहा Video असं देखील म्हटलं जातं की नवजात बाळाला दिवसातून दोन ते तीन तास रडणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी लहान मुलाचे रडणे शुभ मानले जाते. कारण मुलाचे रडणे हे सूचित करते की, ते जिवंत आणि निरोगी आहे. जर मूल जन्मल्यानंतर वेगाने रडत असेल तर समजा की तो पूर्णपणे निरोगी आहे. दुसरीकडे, जर मुल हळू आवाजात रडत असेल, याचा अर्थ असा होतो की त्याला आरोग्य समस्या असू शकतात. लहान मुलांचे रडणे कालांतराने कमी होते, कारण लहान मुले भाषा आणि सामाजिक कौशल्ये विकसित करतात आणि शिकतात, त्यामुळे ते न रडताना देखील त्यांच्या गरजा व्यक्त करु शकतात.