JOIN US
मराठी बातम्या / Viral / नवरदेव घोड्यावर का चढतो? लग्नातील या महत्वाच्या परंपरेबद्दल तुम्हाला माहितीय?

नवरदेव घोड्यावर का चढतो? लग्नातील या महत्वाच्या परंपरेबद्दल तुम्हाला माहितीय?

नवरदेव फक्त घोडीवरच का बसतो, तो घोड्यावर का बसत नाही. यामागे अनेक कारणे आहेत. याविषयी समजून घेऊया.

जाहिरात

सोर्स : सोशल मीडिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जून : भारत हा एक असा देश आहे जिथे इतक्या परंपरा, चालीरिती आहेत की ज्याबद्दल अनेकांना ठावूक नाही. तर काही परंपरा या वर्षांनूवर्षे चालत आल्या आहेत. ज्या आपण फक्त पाळतो पण त्या का केल्या जातात याबद्दल आपल्याला माहिती नाही. विवाहसोहळ्यांमध्ये सर्व प्रकारच्या प्रथा किंवा परंपरा पाळल्या जातात. यातील एक परंपरा जी बऱ्याच ठिकाणी पाळली जाते, ती म्हणजे लग्नाच्या वेळी नवरदेव घोडीवर स्वार का होतो? लग्नासाठी घोडी घेण्यासाठी खूप जास्त पैसे द्यावे लागतात, तर कधी कधी घोडी मिळणं देखील कठीण होतं. पण असं असलं तरी देखील घेडीवरुनच बऱ्याचवेळा नवऱ्याची वरात काढली जाते असं का? नवरदेव फक्त घोडीवरच का बसतो, तो घोड्यावर का बसत नाही. यामागे अनेक कारणे आहेत. याविषयी समजून घेऊया. लग्नात लोक हॅलीकॉप्टर भाड्याने घेतात, पण यासाठी किती पैसे खर्च करावे लागतात माहितीय? वास्तविक, घोडीवर स्वार होण्यामागे एक कारण नाही तर अनेक कारणे आहेत. एक किंवा दोन कारणे अतिशय व्यावहारिक कारणे आहेत, तर काही कारणे परंपरेनुसार सांगितली जातात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घोडीवर स्वार होणे हे नवऱ्याच्या चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. कारण घोडी ही एक चपळ प्राणी आहे आणि फक्त एक निरोगी व्यक्तीच त्यावर स्वार होऊ शकतो. घोडीचा लगाम धरल्याने वराला कुटुंबाची काळजी घेता येते हे दिसून येते. घोडीवर बसणे म्हणजे नवरदेवाची परीक्षा असते असाही एक समज आहे. असे मानले जाते की घोडीवर स्वार होऊन वराला आपल्या प्रेम आणि संयमाने पत्नीच्या चंचल मनावर नियंत्रण ठेवता येते. हे पाहता घोडीवर स्वार झालेल्या वराची चाचणी घेतली जाते की घोडीवर चढलेला वर सर्व जबाबदाऱ्या पार पाडतो.

परंपरा काय त्या जाणून घेऊ एक परंपरा अशीही सांगितली जाते की, प्राचीन काळी जेव्हा विवाह होत असत तेव्हा वधूला शौर्य दाखवावे लागत असे आणि योद्धे घोड्यावर बसून जात असत. अनेक वेळा वधूला पळून जावे लागले. इतिहासात अशी अनेक प्रकरणे आहेत जेव्हा वराला वधूसाठी लढावे लागले. त्या काळात घोडा हे शौर्याचे प्रतीक मानले जात असे. आता बदलत्या काळात घोड्याची जागा घोडीने घेतली असून त्याला शगुन मानले जाऊ लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या