सोर्स : गुगल
मुंबई : आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात. ज्यांकडे आपण फारसं लक्ष देत नाही किंवा विचार करत नाही, पण त्या गोष्टी फारच महत्वाच्या असतात. आता हेच पाहा ना तुम्ही अनेकदा रस्त्यावरील झाडांना (त्याच्या खोडाला) रंग मारलेला पाहिलं असेल. पण हे का मारलं जातं यामागाचं कारण तुम्हाला माहितीय? किंवा कधी तुम्ही ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? झाडाला पांढऱ्या रंगाने रंगवण्याचे खरंतर अनेक कारणं आहेत, ते काय आहेत, चला जाणून घेऊया… लग्नासंबंधीत विचित्र परंपरांबद्दल ऐकून विश्वास बसणार नाही 1. रहदारीसाठी खरंतर झाडांना रंग देण्यामागचं मुख्य कारण म्हणजे रहदारीला सतर्क करणं. झाडांना पांढरा रंग दिला जातो, कारण पांढरा रंग रात्री रिफ्लेक्ट करतो, ज्यामुळे लोकांना रस्ता दिसण्यासाठी किंवा समजण्यासाठी सोप्पं होतं. 2. कीटकांपासून झाडांचं संरक्षण करण्यासाठी झाडांना चुन्याने रंग दिला जातो, त्यामुळे झाडावर कीटक आणि दीमकांचा धोका कमी असतो. चुना झाडांच्या मुळाशी जाऊन झाडांवरील कीटकांचा नाश करतो, त्यामुळे झाडाची मुळे कमकुवत होत नाहीत.
3. सूर्यप्रकाशापासून संरक्षण करते अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की झाडाचं लाकूड सुकतं आणि त्याला तडा जायला सुरुवात होते. त्यामुळे त्यांची साल देठापासून वेगळी होऊ लागते. झाडांना पांढरे रंग दिल्याने सूर्यकिरणांचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही, त्यामुळे झाड निरोगी राहते.