JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral News: विंचवाची पिल्लं जन्मानंतर आपल्याच आईला का खातात? वाचून थरकापच उडेल

Viral News: विंचवाची पिल्लं जन्मानंतर आपल्याच आईला का खातात? वाचून थरकापच उडेल

एक मादी विंचू एकावेळी सुमारे 100 मुलांना जन्म देते. पण आश्चर्याची बाब म्हणजे, ही पिल्लंचं जन्मानंतर आपल्या आईला खातात.

जाहिरात

विंचवाची पिल्लं आपल्याच आईला का खातात?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 08 जुलै : आजपर्यंत तुम्ही विविध प्रकारच्या प्राण्यांबद्दल अनेक रंजक गोष्टी ऐकल्या असतील. आज आम्‍ही तुम्‍हाला विंचवाविषयी सांगणार आहोत. जो अतिशय विषारी आणि धोकादायक प्राणी आहे. विंचू जितका लहान असेल तितका तो विषारी आणि धोकादायक असतो. तो आपल्या डंखाने एखाद्यावर हल्ला करतो. विंचवाच्या नांगीतून बाहेर पडणाऱ्या विषामुळे व्यक्तीला पक्षाघातही होऊ शकतो. याशिवाय विंचवाच्या विषापासून अनेक प्रकारची औषधं बनवली जातात. विंचू अनेकदा विटा किंवा दगडाखाली तळ ठोकतात हे तुम्ही पाहिलं असेलच. ते काळे, मातीच्या रंगाचे किंवा गडद तपकिरी आणि तपकिरी रंगाचे असतात. विंचवांचं शरीर लांब अरुंद असतं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात विंचूच्या 2,000 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. विंचूला सुमारे 20०C ते 37०C तापमानात राहणं आवडतं. परंतु ते गोठवणारी थंडी आणि तीव्र उष्णता सहज सहन करू शकतात. पावसाळ्यात सर्पदंशाच्या प्रकरणांमध्ये वाढ; घरात या वनस्पती लावल्यास साप आसपासही भटकणार नाहीत विंचू सहसा लहान कीटकांना आपली शिकार बनवतात. शिकार करताना विंचू त्यांच्या नांगीने शिकारीच्या शरीरात विष सोडतात. यामुळे त्याची शिकार पॅरालाईज होते आणि नंतर विंचू त्याला जिवंत खातो. याशिवाय मादी विंचूबद्दल बोलायचं झालं तर एक मादी विंचू एकावेळी सुमारे 100 मुलांना जन्म देते. पण आश्चर्याची बाब म्हणजे, ही पिल्लंचं जन्मानंतर आपली आईला खातात. मादी विंचूला पिल्लं होताच ती पिल्लांना पाठीवर बसवून सुरक्षित ठिकाणी घेऊन जाते. ही पिल्लं आपल्या आईच्याच पाठीवर बसून तिचंच शरीर खातात आणि ते पोकळ बनेपर्यंत तिच्या पाठीवरच बसून राहतात. असं सांगितलं जातं, की की विंचूची पिल्लं जन्माला येताच आईच्या पाठीला चिकटतात. यानंतर आईचं शरीर त्या पिल्लांचं अन्न बनतं. विंचवाची पिल्लं मादी विंचू मरेपर्यंत आईच्या पाठीला चिकटून राहतात. जोपर्यंत तिच्या शरीरातील सर्व मांस संपत नाही तोपर्यंत ती तिथेच राहतात. शेवटी मादी विंचू मरते तेव्हा तिची पिल्लं तिच्या पाठीवरून उतरतात. मादी विंचूच्या मृत्यूनंतर तिची मुलं स्वतंत्रपणे जगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या