JOIN US
मराठी बातम्या / Viral / Turtle आणि Tortoise मध्ये फरक काय? दोन्ही ही आहेत वेगवेगळे प्राणी

Turtle आणि Tortoise मध्ये फरक काय? दोन्ही ही आहेत वेगवेगळे प्राणी

हो, आजपर्यंत तुम्ही ज्याला एक समजत होतात. ते दोन्ही शब्द वेगवेगळ्या प्राण्यासाठी वापरले जाते. तसे पाहाता दोन्ही कासवच आहेत, परंतू त्यांच्यात खूप वेगवेगळे पणा आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जुलै : अनेकदा लोकांसोबत असं होतं की आपण ज्या गोष्टीला एक समजत असतो तेव्हा त्या गोष्टी वेगळ्या असतात. तर कधी काही गोष्टी वेगळ्या समज असतो पण त्या एकच असतात. आता कासवाबद्दलच घ्या ना. याला इंग्रजीत उच्चारताना कोणी Turtle तर कोणी Tortoise म्हणतो. अनेकांना वाटतं की कासवाला या दोन्ही नावांनी ओळखलं जाऊ शकतं. पण तुम्हाला माहितीय का की Turtle आणि Tortoise हे दोन्ही वेगवेगळे आहेत? हो, आजपर्यंत तुम्ही ज्याला एक समजत होतात. ते दोन्ही शब्द वेगवेगळ्या प्राण्यासाठी वापरले जाते. तसे पाहाता दोन्ही कासवच आहेत, परंतू त्यांच्यात खूप वेगवेगळे पणा आहे. प्राणीशास्त्रात कासव हे सरपटणाऱ्या प्रजातीचा एक सदस्य आहे, ज्यामध्ये साप, सरडे आणि मगरी इत्यादी येतात, म्हणजेच कासव हा साप, मगरी, सरडा यांचाही नातेवाईक आहे. त्यांच्या अभ्यासाला हर्पेटोलॉजी म्हणतात. Turtleला प्राणीशास्त्राच्या भाषेत Chelon (चिलोन) म्हणतात. तो पूर्णपणे सागरी आहे, म्हणजेच तो फक्त पाण्यात राहतो. तर Tortoise ला Testudo (टेस्टुडो) म्हणतात आणि ते Terrestrial आहे, म्हणजेच ते जमिनीवर राहतात. Turtle आणि Tortoise दोघांनाही शेल म्हणजेच कवच आहे आणि ते पाण्यात राहणारे सरपटणारे प्राणी आहेत, परंतू त्यांच्या कवचाचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये Turtleना पातळ कवच असते जे त्यांना पाण्यात सहज पोहण्यास मदत करतात. तर Tortoiseचे कवच गोलाकार आणि घुमटाकार असतात. Turtleत्यांचे संपूर्ण आयुष्य पाण्यात घालवतात, तर Tortoise जमिनीवर जास्त वेळ घालवतात. म्हणजेच आपल्याकडे काही लोक ज्या कासवांना पाळतात आणि जमीनीवर ठेवतात त्याला Tortoise म्हणतात. Turtleना पोहण्यासाठी फ्लिपरसारखे किंवा जाळीदार पाय असतात, तर Tortoiseना फोल लेग आणि एलिफंटाइन पाय असतात जे त्यांना फिरण्यास आणि अतिरिक्त वजन उचलण्यास मदत करतात. Turtle सर्वभक्षी आहेत आणि जेलीफिश, सीव्हीड आणि इतर समुद्री वनस्पती खातात. तर Tortoise सामान्यतः शाकाहारी असतात आणि ते गवत आणि पालेभाज्या खातात. Turtleचे आयुष्य साधारणपणे 20-40 वर्षे असते, तर Tortoiseचे आयुष्य साधारणपणे 80-150 वर्षे असते. सहसा Turtle मोठे असतात. सर्वात मोठे Turtle “लेदरबॅक” 300 ते 700 किलो वजनाचे असते. Tortoise साधारणपणे Turtleपेक्षा लहान असतात. सर्वात मोठे Tortoise"अल्डाब्रा जायंट" आहे ज्याचे सरासरी वजन 250 किलो आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या