प्रतीकात्मक फोटो
बीजिंग, 15 जून : लग्न म्हटलं की बस्ता आलाच. नवरा-नवरीची खास ड्रेस खरेदी केले जातात. बहुतेक ठिकाणी नवरीकडून नवऱ्याला आणि नवऱ्याकडून नवरीला लग्ना चा ड्रेस दिला जातो. याशिवाय दागिने, चपला हेसुद्धा आलंच. पण तुम्हाला माहिती आहे का? चीनमध्ये नवरीला फक्त लग्नाचा ड्रेस, ज्वेलरी किंवा चपल नाही तर चक्क इनरविअरही द्यावे लागतात आणि विशेष म्हणजे नवरीसाठी हे अंडरगार्मेंट्स नवऱ्यालाच खरेदी करावे लागतात. चीनमध्ये लग्नाची ही विचित्र परंपरा अनेक वर्षापासून चालत आली आहे. इथं नवरदेवाच्या कुटुंबाला नववधूसाठी लग्नात प्रत्येक सामान आणावं लागतं. त्यात अंडरगार्मेंट्सचाही समावेश आहे. हे सामान खरेदी करण्यासाठी नवरदेवासह त्याचं कुटुंब जातं. पण अंडरगार्मेंट्स मात्र नवऱ्यालाच खरेदी करावे लागतात. Wedding Video Viral : वाजतगाजत वरात घेऊन मंडपात आला; वधूपक्षाने नवरदेवाला बांधलं झाडाला कारण… याच अंडरगार्मेंट्सवरून लग्नात राडाही होतो. अंडरगार्मेंट्स न देणं किंवा त्याचा आकार लहान मोठा असणं यावरून लग्नही तुटतं. मानपान, पाहुणाचार, लग्नाची खरेदी, हुंडा किंवा प्रेमप्रकरण यावरून लग्न तुटणं हे तुमच्यासाठी नवीन नाही. पण अंडरगार्मेंटवरून लग्न तुटणं हे तुम्हाला थोडं विचित्रच वाटलं असेल. पण इथं हे गांभीर्याने घेतलं जातं. अशी काही प्रकरणं चीनमध्ये घडली आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच असं एक प्रकरण समोर आलं होतं. जे सोशल मीडियावर व्हायरलही झालं होतं. नवरीला लहान आकाराचे अंडरगार्मेंट्स दिल्याने लग्न मोडलं होतं. नववधू लपतछपत मंडपाबाहेर आली, थेट पळत सुटली; रस्त्यातच अख्खा लेहेंगा काढला आणि… चीनमध्ये या विचित्र परंपरेवरून वाद सुरू आहेत. काही लोक या प्रथेसोबत आहेत तर काही जण या प्रथेला विरोधही करतात.