JOIN US
मराठी बातम्या / Viral / अरे! ही तरुणी फुग्यात कशी शिरली? हा VIDEO पाहून तुम्ही देखील पडाल बुचकळ्यात

अरे! ही तरुणी फुग्यात कशी शिरली? हा VIDEO पाहून तुम्ही देखील पडाल बुचकळ्यात

सध्या इंटरनेटच्या दुनियेत एका तरुणीचं आगळंवेगळं फोटोशूट (Weird Photoshoot) चर्चेत आहे. या फोटोशूटचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल (Viral Video) झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 21 जून : सोशल मीडियावर कोण, कधी आणि कोणत्या गोष्टीमुळे प्रसिद्धीझोतात येईल, हे सांगता येत नाही. सध्या इंटरनेटच्या दुनियेत एका तरुणीचं आगळंवेगळं फोटोशूट (Weird Photoshoot) चर्चेत आहे. या फोटोशूटचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की ही तरुणी एका मोठ्या फुग्यामध्ये हाय हिल्स घालून उभा आहे. तिच्या एका हातामध्ये कुत्र्याची दोरी दिसत आहे आणि कुत्रा फुग्याच्या बाहेर उभा आहे. हा व्हिडिओ अपलोड होताच लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. या व्हिडिओवर आलेल्या कमेंट पाहूनच या गोष्टीचा अंदाज येतो, की हे शूट करणं किती कठीण आणि रिस्की असेल. अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे, की हा कुत्रा जर पळू लागला असता तर तरुणी फुग्यासहित रस्त्यावर घसरत गेली असती. तर, काहींनी म्हटलं आहे, की या फोटोशूटसाठी मुद्दाम लहान कुत्रा आणला गेला आहे, जेणेकरून त्याला या मुलीचं वजनच ओढण्यासाठी झेपणार नाही.

संबंधित बातम्या

VIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्… हे निरनिराळे व्हिडिओ पाहाण्यात अनेकांना मजा वाटत असली तरीही अनेकांचं असंही म्हणणं आहे, की कधी कधी या गोष्टी महागात पडू शकतात. त्यामुळे रिअल लाईफमध्ये अशा प्रकराचे स्टंट करण्यापासून दूर राहाणं गरजेचं आहे. या व्हिडिओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. मात्र, बहुतेकांनी असे स्टंट न करण्याचे सल्ले दिले आहेत. याच कारणामुळे हा व्हिडिओ प्रसिद्धीझोतात आला आहे. ‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ हा व्हिडिओ सोशल मीडियावर दोन दिवसांपूर्वीच शेअर केला गेला होता. हा weirdvidz नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ लाोकांच्या किती पसंतीस उतरत आहे, याचा अंदाज यावरुनच लावता येऊ शकतो, की आतापर्यंत चार लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. यासोबतच अनेकांनी यावर कमेंट करत व्हिडिओ शेअरदेखील केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या