JOIN US
मराठी बातम्या / Viral / Weird Job - ना डिग्री, ना मेहनत, फक्त बसल्या बसल्या तासाला 7 हजार रुपये कमवते ही महिला; कसं ते पाहा

Weird Job - ना डिग्री, ना मेहनत, फक्त बसल्या बसल्या तासाला 7 हजार रुपये कमवते ही महिला; कसं ते पाहा

महिलेने स्वतःचा असा साइड बिझनेस सुरू केला आहे, ज्याचा कुणी कधी विचारही केला नसेल.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 जुलै :  बसल्या बसल्या पैसे मिळावेत असं कुणाला वाटणार नाही. पण पैसे कमवण्यासाठी मेहनत आणि शिक्षणाची गरज पडतेच. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक महिला कोणत्याही डिग्रीशिवाय मेहनत न करता फक्त बसल्या बसल्या पैसे कमवते आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही महिला तासाला सात हजार रुपये कमवते. नताश विक्स असं या महिलेचं नाव. 44 वर्षांची नताशा तशी एक बिहेवियर थेरपिस्ट आहे. लोकांचं जीवन चांगल्या प्रकारे जगण्यासाठी ती त्यांना मदत करते. पण आपल्या या प्रोफेशनशिवाय तिने अतिरिक्त उत्पन्नासाठी एक साइड बिझनेसही सुरू केला आहे. यासाठी डिग्रीची गरज नाही, ज्यात तिला फार मेहनतही करावी लागत नाही. खरंतर यातूनच ती हजारो रुपये कमवते आणि याच कामामुले ती युरोप ट्रिपही करू शकली.

द सनच्या रिपोर्टनुसार, नताशाने युरोपातील विविध देशांमध्ये प्रवास केला आहे. बेल्जियम, आयर्लंड आणि युनायटेड किंग्डममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेली आहे. ती या ठिकाणी जाते ते फक्त फिरण्यासाठी नव्हे तर लोकांना मिठी मारण्यासाठी. हो हग करणं हाच तिचा साइड बिझनेस आहे. याच्या एका सत्रासाठी ती £70 पेक्षा जास्त म्हणजे 7000 रुपये आकारते. आर्टिस्ट डुक्कर! काढली अशी पेटिंग्स, खरेदीसाठी गर्दी; किंमत तब्बल 10 कोटी नताशा म्हणते, की तिचे क्लायंट सांगतात ती त्यांना खूप चांगले मिठी मारते. यामुळेच तिने याला आपला साईड जॉब बनवलं. 2014 सालापासून तिने हे काम सुरू केलं. आता जगभर कडल थेरपी स्वीकारली गेली असल्याने त्यातून पैसे मिळवण्यात अडचण नाही. नताशाने सांगितलं, ती पूर्ण प्रोफेशनलिझमने लोकांना मिठी मारण्याचे काम करते. ती सोफ्यावर बसून लोकांना मिठी मारते आणि प्रेम देते.  ती तिच्या लिव्हिंग रूममध्ये एक मोठा सोफा ठेवते, जिथे ही सत्रे दिली जातात. Foreign Travel: ‘या’ देशात जास्त आहे रुपयांची व्हॅल्यू, स्वस्तात फिरा आणि करा भरपूर शॉपिंग! तिचे ग्राहक वेगवेगळ्या वयोगटातील आहेत. तरुणांपासून वृद्धांपर्यंत त्याची गरज आहे. यामध्ये क्लायंट भावुक होतो. कधीकधी लोक सत्रादरम्यान झोपतात कारण त्यांना चांगलं वाटतं, असं ती म्हणाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या