JOIN US
मराठी बातम्या / Viral / लग्नाचा मंडप क्षणात झाला कुस्तीचं मैदान, नववधू-नवरदेवाच्या मारामारीचा Video Viral

लग्नाचा मंडप क्षणात झाला कुस्तीचं मैदान, नववधू-नवरदेवाच्या मारामारीचा Video Viral

हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील आश्चर्यचकीत झाले आहेत. तसेच लोक या व्हिडीओचा आनंद घेत आहेत आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करत आहेत.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : लग्नाचा सिजन सुरु आहे, ज्यामुळे जिकडे तिकडे तुम्हाला लग्नाचीच गडबड पाहायला मिळेल. सोशल मीडियावर देखील यासंबंधीत व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला हा लग्नाचा स्टेज आहे की कुस्तीचं मैदान हेच कळणार नाही. हो, कारण पाहता पाहता लग्नाचा आनंद हा मारामारीत बदलला. हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील आश्चर्यचकीत झाले आहेत. तसेच लोक या व्हिडीओचा आनंद घेत आहेत आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करत आहेत. व्हिडीओमध्ये वधू-वरांनी स्टेजलाच कुस्तीचे मैदान बनवले आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत. तेव्हा वर नववधूला प्रेमाने मिठाई खाऊ घालत आहे. पण वधूला मिठाई खावीशी वाटत नाही बहुतेक, पण तरी देखील नवरदेव तिला जबरदस्तीने मिठाई खायला देत होता, मग काय रागावलेल्या वधूनं नवरदेवाला जोरदार चापट मारली.

संबंधित बातम्या

यानंतर नवरदेवाचा देखील संयम सुटला आणि त्याने देखील नववधूला मारलं, ज्यानंतर त्या दोघांची मारामारी सुरु झाली आणि हे भांडण जोरदार पेटलं. नववधू आणि नवरदेव दोघांचे कुटुंबीय त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण ते दोघेही थांबण्याचं नाव घेत नव्हते आणि हा व्हिडीओ इथेच संपला आहे. कधी पाहिलाय का असा ‘कोंबडा डान्स’? Viral Video पाहून नेटकरी देखील हैराण हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या पेजवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “भाऊ त्यांना WWE वर पाठवा”. तर दुसर्‍याने “त्याचे लग्न झाले की नाही” असा प्रश्न विचारला आहे. आता या दोघांच्या भांडणाचं पुढे काय झालं, लग्न मोडलं की काय? याबद्दल फारशी माहिती मिळाली नाही. तसेच हा व्हिडीओ केव्हाचा आहे? हे देखील कळू शकलेलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या