घरात शिरलं पाणी आणि व्यक्ती करतोय मासेमारी
नवी दिल्ली, 01 जुलै : पावसाळा सुरु झाला असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून नागरिकांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यात नागरिकांचा संताप होतो, अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याविषयीच्या अनेक घटना समोर येत असतात. नुकतीच एक घटना समोर आलीये ज्यामध्ये एका व्यक्तीच्या घरात पाणी शिरलं मात्र यानंतर त्यानं जे केलं ते थक्क करणारं आहे. महिलेनं घरात पाणी शिरल्यावर आपली पती काय करत होता सांगितलं. याविषयी व्हिडीओ शेअर करताच तो सध्या सोशल मीडियावर जोरदावर व्हायरल झाला. लोकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या. सध्या ही घटना चर्चेत आली आहे.
एका घरात बेडरुममध्ये पाणी शिरलं. तर व्यक्तीला त्या परिस्थितीत मासे पकडण्याची कल्पना सुचली आणि तो बेडवर चढून मासे पकडू लागला. मासे तर त्याला मिळाले नाहीत मात्र त्याच्या जाळ्यात किडे अकडले. त्या व्यक्तीच्या पत्नीनं त्याचं हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं. साऊथ चायना मॉर्निगनने याविषयी वृत्त दिलं. दरम्यान, ही घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्यक्तीच्या या कृतीवर तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. अशा मजेशीर आणि विचित्र घटना इंटरनेटवर व्हायरल होत असतात. Viral News : प्रेग्नेंसीमध्ये महिलेला इतक्या उलट्या झाल्या की दातच तुटायला लागले दरम्यान, जगभरात अनेक वेगवेगळे लोक आहेत. यापैकी काही कधी काय करतील काही सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या विचित्र घटना सोशल मीडियावर समोर येत असतात.