नवी दिल्ली 11 जून : महिलांची सुरक्षा हा आजच्या काळात मोठा प्रश्न बनला आहे. वारंवार दावे करूनही प्रशासन महिलांच्या सुरक्षेची खात्री देण्यास असमर्थ आहे. अशा परिस्थितीत आजच्या महिला स्वत: एवढ्या सक्षम होत चालल्या आहेत की त्यांना कोणाकडूनही सुरक्षा घेण्याची गरज नाही. ती स्वतःचं रक्षण करू शकते. अलीकडेच, याचा पुरावा एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसला. ज्यामध्ये एका महिलेनं स्वतःच आपली सुरक्षा केली (Waitress Beat Men). पाळीव श्वानांना वाचवण्यासाठी जंगली अस्वलासोबत भिडली महिला; थरारक घटनेचा VIDEO ट्विटर अकाउंट @TansuYegen वर अनेकदा धक्कादायक व्हिडिओ शेअर केले जातात, जे पाहून लोक थक्क होतात. काल म्हणजेच 10 जून रोजी असाच एक व्हिडिओ (Shocking Video Viral) शेअर करण्यात आला आहे. ज्या व्हिडिओची चर्चा होत आहे, तो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे. यामुळे आम्ही त्याच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. महिला सक्षमीकरणासाठी बनवलेला हा नियोजित व्हिडिओ असण्याची शक्यता आहे.
हा व्हिडिओ एका रेस्टॉरंटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून रेकॉर्ड झाल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक वेट्रेस दोन ग्राहकांना जेवण देत आहे. अचानक एक ग्राहक उभा राहतो आणि महिलेच्या पाठीला हात लावू लागतो. दुसरा ग्राहकही त्याला साथ देताना दिसत आहे. या स्थितीत महिलेने तात्काळ रौद्ररूप धारण करत दोघांवरही हल्ला केला. या महिलेनं मार्शल आर्टचं अप्रतिम प्रदर्शन केलं आणि दोघांना मारहाण करून त्यांची अवस्था बिकट केली. यात एका व्यक्तीने महिलेला खुर्चीने मारण्याचाही प्रयत्न केला. मात्र महिलेनं त्याला लाथ मारली आणि तो दूर जाऊन कोसळला. बेस्ट बसमध्ये चढू दिलं नाही, गाडी थांबवून फोडली काच, मुंबईत तरुणाच्या हिरोपंतीची VIDEO व्हायरल हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. याला 11 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 71 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी कमेंट करून प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अनेकांनी या महिलेचं कौतुक केले आणि प्रत्येक महिलेनं अशाच प्रकारे निर्भय राहण्याचा सल्ला दिला. तर अनेकांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचं म्हटलं. काही लोकांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये एका पुरुषाने महिलेला मारहाण करण्यास सुरुवात करताच तिच्या बचावासाठी काही लोक तिथे आले.