व्हायरल व्हिडीओ
मुंबई, 25 जुलै : सध्या लोकांमध्ये स्टंटबाजीची क्रेझ अधिक पाहायला मिळत आहे. प्रसिद्धीसाठी किंवा कधी कधी सोशल मीडियावर काही व्ह्यूजसाठी तरुण मंडळी काहीही करायला तयार होतात. काही लोक तर अगदी आपल्या प्राणाची बाजी देखील लावायला मागेपुढे पाहात नाही. ज्यामुळे अनेकांनी आपले प्राण देखील गमवले आहे तर काही लोक गंभीर जखमी देखील झाले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती स्टंटबाजी करताना दिसला आहे. हा व्हिडीओ पाहून आधी तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल, परंतू पुढे हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्की हसू येईल. Delhi Meerut Expressway कपलचा रोमान्स कॅमेरात कैद, भरधाव वेगात गाडी पळवत धक्कादायक कृत्य लोक व्ह्यूज आणि लाईक्सच्या मागे इतके वेडे असतात की कधी कधी कुठेही स्टंट करायला लागतात. अशीच चुक या व्हिडीओमधील व्यक्तीनं केली. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती आपली बाईक घेऊन उंच डोंगराव चढण्याचा प्रयत्न करत आहे. तो जवळजवळ डोंगर चढतो देखील. पण अखेरच्यावेळी त्याचा बॅलेंस बिघडतो ज्यामुळे त्याचा तोल बिघडतो आणि तो खाली पडतो. आधी त्याची बाईक त्या डोंगरावरुन खाली पडली आणि नंतर तोही खाली कोसळला. हा माणूस ज्यापद्धतीने खाली पडला ते दृश्य पाहून सगळे हसत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. ज्यावर असंख्य लाईक्स आणि कमेंट्स देखील आले आहेत.