थरारक व्हिडीओ
मुंबई, 30 मे : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. इथे प्राण्यांपासून ते माणसांपर्यंत वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक तर कधी धक्कादायक असतात. सध्या एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल. हा व्हिडीओ सापाशी संबंधीत आहे. ज्यामध्ये एक चिमुकली सापाच्या दंशापासून थोडक्यात बचावली आहे. सहसा सापाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी देखील लोक लांब पळतात. पण जर सापच घरात घुसुन आला तर काय करावं? विषारी आणि धोकादायक सापांचे आकर्षक रुप कधी पाहिलंय? पाहा जगातील सुंदर सापांचे PHOTO सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या सापाच्या व्हिडीओमध्ये एक साप घरात घुसल्याचं दिसतं. तो भिंतीच्या कडेला असताना तिथे एक चिमुकली आहे. तेवढ्यात साप मागे झाला. जेव्हा चिमुकलीनं हे पाहिलं तेव्हा ती मागे झाली आणि रुममध्ये पळाली. हे संपूर्ण प्रकरण जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. हा व्हिडीओ ज्याने कोणी पाहिला त्याच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. खरंच नागाला मारल्यावर नागीण बदला घेते? सापांसंबंधीत काही मान्यता आणि सत्य हा व्हिडीओ बेळगावातील हलगा गावातील आहे. इथे एक चिमुरडी सापाच्या तावडीतून बचावली. ही मुलगी घरातील एका खोलीत जात होती, तेव्हा तिथे भिंतीच्याकडेला एक साप होता. नशीबाने सापाने चिमुकलीवर हल्ला केला नाही. त्यानंतर चिमुकलीनं जेव्हा साप पाहिला तेव्हा ती ओरडत आत खोलीत पळाली.
पावसाळ्याला आता सुरुवात होणार आहे. तर काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. ज्यामुळे साप आता बिळा बाहेर पडले आहेत आणि सापांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे बऱ्याचदा रस्त्यावर देखील साप पाहायला मिळतात. त्यामुळे आता लोकांनी देखील सावध राहण्याची गरज आहे.