मांजरीचा व्हिडीओ व्हायरल
मुंबई, 17 जुलै : सोशल मीडियावर मांजर प्रेमींची कमी नाही. त्यामुळे इथे दररोज हजारो मांजरी संबंधीत फोटो अपलोड केले जातात आणि पाहिलेही जातात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो मांजरीशी संबंधीत आहे. ज्यामध्ये मांजरीचं काही वेगळंच रुप पाहायला मिळालं. आपण मांजरीला मावशी म्हणतो, परंतु या व्हिडीओत मात्र ती आईच होताना दिसली, ते ही एका माकडाची. सामान्यतः भिन्न स्वभावाचे दोन प्राणी एकमेकांपासून दूर राहणे योग्य समजतात. पण अनेकवेळा त्यांच्यातही अप्रतिम बॉन्ड पाहायला मिळतो. इंटरनेटवर अशी अनेक उदाहरणे तुम्ही याआधी पाहिली असतील. ज्यामध्ये कुत्रा मांजराला मदत करताना किंवा मांजर ससाला वाचवताना दिसले असते. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वेगळंच दृश्य पाहायला मिळत आहे. जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. ही क्लिप मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर ‘फिगेन’ (@TheFigen_) नावाच्या खात्याद्वारे पोस्ट केली गेली आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे- मांजरीने हरवलेल्या माकडाच्या मुलाला दत्तक घेतले. 13 जुलै रोजी पोस्ट करण्यात आलेल्या या क्लिपने प्राणीप्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या व्हिडीओत मांजर त्या माकडाच्या पिल्लाची आई झाली आहे, ज्यामुळे माकड या मांजरीच्या पोटाजवळ बसलं आहे आणि त्या लहान मुलासोबत मांजर फिरत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यामध्ये हे स्पष्टच होत आहे की आईची जागा एका मावशीनं घेतली आहे.