JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video: कुत्र्यानं केला प्रँक, मालकाची झाली 'ही' अवस्था; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

Viral Video: कुत्र्यानं केला प्रँक, मालकाची झाली 'ही' अवस्था; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

Viral Video of Dog doing Prank: तुम्ही माणसांचे बघितलेले अनेक प्रँक पाहिले असतील, परंतु एखाद्या प्राण्याने एखाद्या व्यक्तीशी केलेला प्रँक तुम्ही पाहिला आहे का? एका क्यूट डॉगीने त्याच्या मालकाशी केलेल्या प्रँकचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार आहे.

जाहिरात

Viral Video: कुत्र्यानं चक्क मालकासोबतच केला प्रँक; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जून : कुत्रा हा अतिशय प्रामाणिक, इमानदार परंतु तितकाच भयंकर प्राणी आहे. कुत्र्यांचे (Dog) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) आपण पाहतो. परंतु एखाद्या कुत्र्याने प्रँक केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? नाही ना? सध्या एका क्यूट डॉगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. एक छोटा गोंडस कुत्रा चक्क आपल्या मालकाशीच प्रँक करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. 30 सेकंदाच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर लाखो लाईक्स मिळाले आहेत आणि हा व्हिडीओ पाहून लोक हसून हसून वेडे झाले आहेत. हा गोंडस कुत्रा त्याच्या मालकाशी करत असलेला प्रँक (Viral Video of Puppy doing Prank)लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. हेही वाचा-  VIDEO: लग्नाचा अतिउत्साह पडला महागात, नवरदेवाला बसला 2 लाखांचा फटका गोंडस कुत्र्याचा मालकाशी सुपर प्रँक - व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपल्याला दोन गोंडस कुत्रे दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये कुत्र्याचा मालक पायऱ्यांवरून वर येताना दिसतआ आहे. दरम्यान एखाद्या लहान मुलाप्रमाणेच एक कुत्रा त्याच्या मालकाची गंमत करण्यासाठी भिंतीच्या मागे लपून बसतो. तो माणूस जिना चढून वर पोहोचताच हा कुत्रा अचानक बाहेर येतो आणि त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. थोड्या वेळाने हा कुत्रा थांबतो आणि त्या व्यक्तीकडे बघतो आणि त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहतो. यानंतर कुत्रा आणि मालक अगदी आनंदात घरामध्ये जातात.

संबंधित बातम्या

मालकासोबत मस्ती करतानाचा हा गोंडस व्हिडिओ योगच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘कुत्र्याच्या पिल्लानं मालकाशी प्रँक केला.’ इंटरनेटवर धुमाकूळ घालणारा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 24 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सही चांगल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका यूजरने कमेंट बॉक्सवर लिहिले की, ‘हे खूप क्यूट आहे’. तर दुसर्‍याने लिहिले, “ते कसे शिकतात ते समजत नाही. एकाने लिहिले, हे खूप मोहक आहे, तर दुसर्‍याने लिहिले, ‘हे खूप क्यूट आहे’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या