JOIN US
मराठी बातम्या / Viral / अफगाणिस्तानवर कब्जा करताच पार्कमध्ये खेळताना दिसले तालिबानी; गाड्यांवर अन् घोड्यावर बसून मस्ती करतानाचे VIDEO

अफगाणिस्तानवर कब्जा करताच पार्कमध्ये खेळताना दिसले तालिबानी; गाड्यांवर अन् घोड्यावर बसून मस्ती करतानाचे VIDEO

आता दुसरीकडे असेही काही व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात तालिबानचे लोक मस्ती करताना (Taliban Playing Bumper Cars) दिसत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

काबूल 17 ऑगस्ट : तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा (Taliban Regains Control on Afghanistan) केल्यानंतर समोर येणाऱ्या बातम्या अक्षरशः थरकाप उडवणाऱ्या आहेत. तालिबान्यांमुळे घाबरलेले आणि चिंतेत असलेले लोक आपलाच देश सोडून पळत आहेत. काही जण विमानाच्या टायरला लटकत आहेत. तर, काबूल एअरपोर्टवर झालेल्या प्रचंड गर्दीचा व्हिडिओही सर्वांचं लक्ष वेधणारा ठरला. कोणत्याही परिस्थितीत देश सोडायचा या प्रयत्नात हे लोक आपल्या जीवाचीही पर्वा करत नसल्याचं चित्र (Situation in Afghanistan) आहे. अशात आता दुसरीकडे असेही काही व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात तालिबानचे लोक मस्ती करताना (Taliban Playing Bumper Cars) दिसत आहेत.

तालिबानचं वार्षिक उत्पन्न वाचून व्हाल थक्क, तीन ठिकाणांहून होते मजबूत कमाई काही असे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल (Viral Videos of Taliban) होत आहेत, ज्यात तालिबानी खेळण्याच्या पार्कमध्ये जाऊन झोपाळ्यावर बसून आनंद घेताना दिसत आहेत. दोन्ही बाजूंचे हे व्हिडिओ पाहिल्यास मोठा विरोधाभास दिसत आहे. मात्र, हे दोन्ही व्हिडिओ एकाच देशातील आहे आणि एकाच स्थितीतील आहेत.

भयंकर! तब्बल 15 वेळा केला चाकूनं हल्ला नंतर फोडले डोळे; महिलेसोबत अमानुष कृत्य काबूलवर कब्जा केल्यानंतर एका दिवसातच हे तालिबानी अफगाणिस्तानातील एका पार्कमध्ये सवारीचा आनंद घेताना दिसले. तालिबानी हातामध्ये हत्यार घेऊन इलेक्ट्रिक बंपर कारची सवारी करताना दिसले. तर, आणखी एका व्हिडिओमध्ये ते पार्कमध्ये घोडेस्वारी करतानाही दिसले. हे व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या