JOIN US
मराठी बातम्या / Viral / गरुडाने फक्त एका पंजातच दुसऱ्या पक्षाला उचलून नेलं; शिकारीचा असा VIDEO कधी पाहिलाय का?

गरुडाने फक्त एका पंजातच दुसऱ्या पक्षाला उचलून नेलं; शिकारीचा असा VIDEO कधी पाहिलाय का?

सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक गरुड दिसत आहे, जे इतर गरुडांपेक्षा खूप वेगळं आणि मोठं आहे.

जाहिरात

गरुडाने पक्षाला पंजात पकडून नेलं

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 25 जून : गरुड, ससाणा आणि गिधाड यांसारख्या पक्ष्यांना शिकारी पक्षी म्हटलं जातं. जेव्हा ते इतर प्राण्यांवर हल्ला करायला जातात, तेव्हा ते त्यांना एका झटक्यात पकडून त्यांची शिकार करतात. त्यांचा हल्ला अतिशय धोकादायक असतो की इतर पक्ष्यांना त्यांच्यापासून बचाव करणं कठीण होऊन जातं. या पक्ष्यांचा आकारही मोठा आहे. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक गरुड दिसत आहे, जे इतर गरुडांपेक्षा खूप वेगळं आणि मोठं आहे. ते इतकं मोठं आहे की फक्त एका पंजाने शिकार पकडताना दिसतं. @viralhog या Instagram अकाउंटवर अनेकदा विचित्र व्हिडिओ पोस्ट केले जातात. अलीकडेच या अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक गरुड शिकार करताना दिसत आहे. हा गरूड आकाराने खूप मोठा आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे- “तुम्ही ते खाणार आहात का? खाणार नसाल तर मी ते घेऊन जातो!” व्हिडिओमध्ये हा गरूड पक्षी दुसऱ्या पक्षाला उचलून नेताना दिसत आहे. हा गरूड एका रेस्टॉरंटच्या अगदी जवळ येतो, आत बसलेले लोक त्याचा व्हिडिओ बनवत आहेत.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये एक कार पार्किंग दिसत आहे. ज्यामध्ये अनेक गाड्या उभ्या आहेत. बाहेर एक छोटीशी बाग आहे. ज्यावर एक पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा गरुड दिसतो. गरुड हळू हळू पुढे जातो. तिथे एक कबूतर पडलेलं असतं. गरुड आधी आजूबाजूला पाहतो की कोणी तिथे येत आहे का. मग तो त्या कबुतराला आपल्या एका पंजाने उचलतो आणि तिथून उडून जातो. त्याचा आकार खूप मोठा आहे आणि एवढा मोठा गरुड तुम्ही कदाचित आजपर्यंत पाहिला नसेल.

या व्हिडिओला 50 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने विचारलं, की तो पक्षी कसा मेला, गरुडाने मारला का? एकाने म्हटलं, की गरूड अनेकदा त्याच्या घराच्या समोर येतात . तिसऱ्याने म्हटलं, की गरुडाने त्याला पंजाने पकडलं नाही, त्याने फक्त आपली नखं आत घातली आणि पक्ष्याला घेऊन उडून गेला. इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या