महाकाय अजगरासोबत खेळताना मुलगा
नवी दिल्ली, 18 मे : लहान मुलं ही खूप खोडकर असतात. त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवावं लागतं. थोड्यावेळासाठीही त्यांना एकटं सोडलं तरी ते काहीतरी कारनामा करतात आणि नंतर पालकांना तो ठिक करावा लागतो. सोशल मीडियावर असे प्रकार जास्त करुन पहायला मिळतात. त्यांचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. कधी कधी लहान मुलांचे मजेशीर व्हिडीओ पहायला मिळतात तर कधी श्वास रोखून ठेवणारे व्हिडीओ व्हायरल होतात. अशाच काहीसा एक व्हिडीओ सध्या समोर आला. जो पाहून तुम्हालाही घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक लहान मूल एका महामकाय अजगराशी खेळताना दिसत आहे. साधारणत: महाकाय अजगर पाहून लोक जीव वाचवून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र हे मूल त्याच्यासोबत खेळताना आणि त्याला त्रास देताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका महाकाय अजगर दिसत आहे. त्याच्याशेजारी एक लहान मुलही आहे. ते लहान मुल चक्क या महाकाय अजगरासोबत खेळत आहे. कधी त्याचं त्याच्या मानेला पकडून उचलत आहेत तर कधी त्याच्या पाठीवर बसत आहे. हे सर्व तो चिमुकला न घाबरता करत आहे. आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे कोणीतरी व्यक्ती त्याला त्याच्यासोबत खेळून देत त्याचा व्हिडीओ बनवत आहे.
@TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा थराराक व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येताना दिसत आहे. 30 सेकंदांचा व्हिडीओ शेअर करत बेजबाबदार पालक असं कॅप्शन व्हिडीओला दिलं आहे. दरम्यान, अजगर हा खूप भयानक प्राण्यांपैकी एक आहे. त्याच्या हल्ल्यात जिवंच राहणं खूप अवघड गोष्ट आहे. त्यामुळे लोक त्याचं नाव घेतलं तरी घाबरतात. मग त्याच्या जवळ उभं राहणं किंवा त्याला हात लावणं ही गोष्ट दूरचीच आहे.