कुत्र्याचं नशीब बलवत्तर म्हणू... (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)
मुंबई, 20 ऑगस्ट : मोठ्या रस्त्यांवरील गाड्या किती वेगाने धावतात आपल्याला माहिती आहे. साधा माणूसही असा रस्ता ओलांडण्याची हिंमत करणार नाही आणि तसं केलं तर काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी. भरधाव गाड्या धावणाऱ्या ज्या रस्त्यावर आपण माणसाचा जीव बचावेल याची शाश्वती देऊ शकत नाही, तिथं कुत्र्यासारख्या प्राण्याचा काय निभाव लागेल. नाही का? पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, इवल्याशा कुत्र्याच्या पिल्लाने (Dog on road) आपल्या या विचारावर पुन्हा विचार करायला भाग पाडलं आहे (Dog on road video). कुत्र्याच्या अंगावरून भरधाव गाड्या गेल्या पण तरी त्याला काहीच झालं नाही. त्यातून तो बचावला आहे. या कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात ना, तेच या कुत्र्याच्या बाबतीत दिसून आलं आहे.
व्हिडीओत पाहू शकता कुत्र्याचं छोटंसं पिल्लू रस्त्यावर आहे. रस्त्यावरून एकामागोमाग एक अशा भरधाव गाड्या येत आहेत. काही गाड्या या कुत्र्याच्या वरून जातात तर काही अगदी त्याच्या कडेने जातात. पण कुत्र्याला काहीच होत नाही. प्रत्येक वेळी त्याचं नशीब त्याला साथ देताना दिसतं. त्याचा जीव वाचतो. पण कुत्र्याचं पिल्लू इतकं घाबरलेलं आहे की ते पळत रस्त्याच्या दुसऱ्या दिशेलाही जाण्याचा प्रयत्न करत नाही. हे वाचा - अस्वलाची शिकार करायला गेला आणि स्वतःच ठोकली धूम; वाघासोबत नेमकं काय घडलं पाहा इतक्यात आणखी एक गाडी येते. पण ही गाडी कुत्र्याच्या वरून जात नाही किंवा त्याच्या कडेने जात नाही. तर गाडीचालक रस्त्यावरील कुत्र्याच्या पिल्लाला पाहून त्याच्यासमोर आपली गाडी थांबवतो. गाडीतून तो उतरतो आणि त्या आपल्या हातात घेतो. आता ही व्यक्ती त्या कुत्र्याला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उचलून ठेवेल असं वाटतं. पण नाही ती व्यक्ती तसं करत नाही तर त्या कुत्र्याच्या पिल्लाला आपल्यासोबतच घेऊन जाते. या कुत्र्यासाठी ही व्यक्ती म्हणजे देवदूतच बनून आला आणि त्याचा जीव वाचवला. आतापर्यंत कुत्र्याला त्याच्या नशीबाने साथ दिली आणि नंतर या देवदूताने त्याला पुढील संभाव्या मृत्यूपासून वाचवलं. हे वाचा - VIDEO - एकासाठी दोघांनी लावली आपल्या जीवाची बाजी; समोरून धडधडत ‘मृत्यू’ आला आणि… 5njabi_mehkma इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.