JOIN US
मराठी बातम्या / Viral / काय सांगता! या गावात माशा होऊ देईना तरुणांचं लग्न; कहाणी वाचून थक्क व्हाल

काय सांगता! या गावात माशा होऊ देईना तरुणांचं लग्न; कहाणी वाचून थक्क व्हाल

एक गाव माशांच्या त्रासाने हैराण झालं आहे. त्यामुळे या गावातील मुलांना कोणी लग्नासाठी आपल्या मुली द्यायलाही तयार होत नाहीये.

जाहिरात

माशांमुळे होईना तरुणांची लग्नं

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 30 जून : आजपर्यंत तुम्ही तुमच्या घरात खूपदा माशा पाहिल्या असतील. यांच्यामुळे वातावरण खराब होतं. स्वयंपाक घरामध्ये माशा आल्या की जेवण करण्याचीही इच्छा होत नाही. मात्र, आता एका गावाची वेगळीच कहाणी समोर आली आहे. या गावातील लोकांचं जगणंच माशांने अवघड करून टाकलं आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातून एक अनोखी आणि अजब घटना समोर आली आहे. येथे एक गाव माशांच्या त्रासाने हैराण झालं आहे. त्यामुळे या गावातील मुलांना कोणी लग्नासाठी आपल्या मुली द्यायलाही तयार होत नाहीये. ज्यांची लग्नं झाली आहेत ते गावात राहायला तयार नाहीत. एवढंच नाही तर नातेवाईक गावात येण्यास टाळाटाळ करतात. माशांच्या दहशतीमुळे गावकऱ्यांना नीट जेवताही येत नाही आणि झोपही येत नाही, अशी स्थिती आहे. ते जेवायला बसतात तेव्हा हजारो माशा अन्नावर बसतात. त्यामुळे लहान मुलं आजारांना बळी पडत आहेत. अनेकवेळा तक्रार करूनही अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने दखल घेतली नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे. लग्नाचे विधी सुरू असताना नवरदेवाचा चेहरा पाहताच हादरली नवरी; पोलिसांत पोहोचलं प्रकरण हे प्रकरण उन्नाव जिल्ह्यातील नवाबगंज ब्लॉकमधील रुदवारा गावातील आहे. माशांच्या उपद्रवामुळे येथील परिस्थिती वाईट झाली आहे. गावात पोल्ट्री फार्म सुरू झाल्यापासून अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे माश्या आल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे जगणं कठीण झालं आहे. सुमारे 5 हजार लोकसंख्या असलेल्या गावातील लोक इतके घाबरले आहेत, की ते मच्छरदाणीच्या आत बसून जेवण करतात. गावातील महिलांनी सांगितलं की, आता लोक त्यांच्या गावात आपल्या मुली देण्यासही तयार नाहीत. ज्यांचं लग्न झालं आहे ते इथे राहायला तयार नाहीत. माशीच्या भीतीने नातेवाईकही येण्यास टाळाटाळ करतात. स्वयंपाकासाठी खूप त्रास सहन करावा लागतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या