JOIN US
मराठी बातम्या / Viral / लग्नातील युनिक Viral Videos; ज्यांनी खळखळून हसवण्यासोबतच जिंकलं नेटकऱ्यांचं मन

लग्नातील युनिक Viral Videos; ज्यांनी खळखळून हसवण्यासोबतच जिंकलं नेटकऱ्यांचं मन

सध्या लग्नातील असेच दोन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यातील एक वरमाळेच्या कार्यक्रमातील आहे तर दुसरी नवरदेवाचे बूट चोरतानाच्या मस्तीचा आहे.

जाहिरात

लग्नातील युनिक Viral Videos

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 10 जून : इंटरनेटवर लग्नाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ अतिशय अजब असतात, काहींमध्ये नवरी हटके अंदाजात मंडपात एन्ट्री घेताना दिसते. तर काही व्हिडिओ अतिशय रोमँटिक आणि नेटकऱ्यांचं मन जिंकणारे असतात.. सध्या लग्नातील असेच दोन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यातील एक वरमाळेच्या कार्यक्रमातील आहे तर दुसरी नवरदेवाचे बूट चोरतानाच्या मस्तीचा आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरीबाई स्टेजवर अतिशय आनंदात गोविंदाच्या सुपरहिट हद कर दी आपने या गाण्यावर परफॉर्म करत नवरदेवाच्या गळ्यात वरमाला घालते. नवरीची ही हटके आणि अनोखी स्टाईल नेटकऱ्यांचं मन जिंकत आहे. नवरी अतिशय उत्साहात परफॉर्म करत नवरदेवाच्या जवळ जाते आणि त्याच्या गळ्यात वरमाळा घालते. तर नवरदेव उभा राहून स्मितहास्य करत तिच्याकडे पाहात राहातो. व्हिडिओच्या शेवटी नवरी नवरदेवाच्या मांडीवर बसून त्याच्या गालावर किस करताना दिसते.

दुसऱ्या व्हिडिओमध्ये लग्नात मेहुण्या एका नवरदेवाचा बूट चोरण्याची प्रयत्न करताना दिसतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरी आणि नवरदेव खुर्चीवर बसलेले आहेत. इतक्यात नवरीच्या बहिणी तिथे येतात. त्या नवरदेवाच्या पायातील बूट काढून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र अपयशी ठरतात. यानंतर मेहुण्या इतका जोर लावतात की बूटासह नवरदेवालाही खुर्चीवरून खाली ओढून घेतात.

नवरदेव खुर्चीवरुन खाली पडतो आणि हा सगळा गोंधळ पाहून हसू लागतो. यानंतर काही वेळाने एका तरुणाच्या हातात नवरदेवाचा बूट दिसतो आणि दुसरीकडे नवरदेव पैसे मोजताना दिसतो. हा मजेशीर व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या