JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral News : 'प्लॅस्टिक द्या सोने घ्या' या गावातील अनोखी स्कीम चर्चेत

Viral News : 'प्लॅस्टिक द्या सोने घ्या' या गावातील अनोखी स्कीम चर्चेत

आजकाल जिकडे तिकडे प्लॅस्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात पडलेला पहायला मिळतो. प्लॅस्टिकवर बंदी घातली असतानाही अनेकजण प्लॅस्टिकचा वापर करुन फेकून देतात.

जाहिरात

'प्लास्टिक द्या सोने घ्या' या गावातील अनोखी स्कीम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 जुलै : आजकाल जिकडे तिकडे प्लॅस्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात पडलेला पहायला मिळतो. प्लॅस्टिकवर बंदी घातली असतानाही अनेकजण प्लॅस्टिकचा वापर करुन फेकून देतात. त्यामुळे अनेक ठिकाणी प्लॅस्टिकचा कचरा साचलेला दिसून येतो. मात्र असंही एक गाव जिथे प्लॅस्टिक कमी व्हावं म्हणून सरकारनं अनोखी स्कीम राबवली आहे. जिथे प्लॅस्टिकच्या बदल्यात लोकांना सोनं दिलं जातं. ही अनोखी, अजब स्कीम काय आहे याविषयी जाणून घेऊया. प्लॅस्टिकमुक्त पृथ्वी हे स्वप्न पाहत एका गावानं यासाठी पुढाकार घेतला आहे. या ठिकाणी 20 क्विंटल प्लास्टिक कचरा दिल्यावर एक सोन्याचं नाणं मिळतं. हे गाव जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आहे. ज्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील सदिवरा या गावात ही अनोखी स्कीम राबवली जात आहे. येथील सरपंचांनी प्लास्टिकमुक्त करण्याचा मोठा उपक्रम सुरू केला. गावचे सरपंच फारुख अहमद गणई यांना गाव प्लास्टिक प्रदूषणमुक्त करायचे आहे. त्यांनी यासाठी बरेच प्रयत्न केले मात्र यामध्ये त्यांना फारसं यश मिळालं नाही. यानंतर त्यांनी शक्कल लढवत अनोखी स्किम नागरिकांना दिली. या स्किममुळे लोकांनी तुफान गर्दी झाली. शेजारी चित्ता तरीही बेधडकपणे गवत खात होतं हरिण, Video पाहून व्हाल थक्क सरपंचांनी ‘प्लास्टिक दो और सोना लो’ ही मोहीम सुरू केली. या योजनेंतर्गत कोणी 20 क्विंटल प्लास्टिक कचरा दिल्यास पंचायत त्याला सोन्याचे नाणं देईल. मोहीम सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत संपूर्ण गाव प्लास्टिकमुक्त घोषित करण्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे पाहून जवळपासच्या इतर अनेक पंचायतींनीही त्याचा अवलंब केल्याचं अनेक अहवालांमध्ये नमूद करण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या