JOIN US
मराठी बातम्या / Viral / नवरीची अनोखी एन्ट्री पाहून घालाल तोंडात बोटं; कधीही पाहिला नसेल असा Wedding Video

नवरीची अनोखी एन्ट्री पाहून घालाल तोंडात बोटं; कधीही पाहिला नसेल असा Wedding Video

लग्नातील अनेक निरनिराळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Wedding Video) होत राहतात. सध्या नवरीच्या एन्ट्रीचा असाच एक व्हिडिओ (Bride Entry Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 04 मार्च : आपल्या लग्नाबद्दल प्रत्येक कपलने वेगवेगळी स्वप्नं रंगवलेली असतात. आपल्या ड्रेस आणि ज्वेलरीपासून व्हेन्यू डेकोरेशनपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे ते विशेष लक्ष देतात. नवरीच्या एन्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर आपली एन्ट्री (Bride Entry) अतिशय खास असावी अशी प्रत्येक नवरीची इच्छा असते. अनेकदा नवरीची धमाकेदार एन्ट्री सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. तर अनेकदा नवरदेव आपल्या आगळ्यावेगळ्या अंदाजाने सर्वांचं मन जिंकतो. लग्नातील अनेक निरनिराळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Wedding Video) होत राहतात. सध्या नवरीच्या एन्ट्रीचा असाच एक व्हिडिओ (Bride Entry Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पेट्रोलवाली लव्हस्टोरी! फक्त Petrol साठी नवरीबाई लग्नाच्या बोहल्यावर चढली

आधी नवरीबाई ओढणीने आपला चेहरा झाकत मंडपात नवरदेवाजवळ यायची. मात्र आता सगळंच बदललं आहे आणि नवरीबाई आता लाजत नाही तर नाचच-गात लग्नात एन्ट्री करते. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक नवरी रथावर बसून आपल्या नवरदेवाकडे येत असल्याचं पाहायला मिळतं. नवरीबाईचा हा आगळावेगळा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरीबाई अतिशय सुंदर तयार झाली आहे आणि लव्ह आज कल या फिल्ममधील ‘ला ला ला ला हो गई रे’ गाण्यावर बसल्या बसल्या इन्जॉय करत आहे. तिच्या कुटुंबातील सदस्यही तिच्याजवळच डान्स करत आहेत. नवरी आपल्या आयुष्यातील या खास दिवसासाठी अतिशय उत्साही आणि आनंदी असल्याचं दिसतं.

बाबो! वहिनीचा डान्स पाहून सोशल मीडियावर ‘हाहाकार’; आवरणं झालंय कठीण, पाहा Video

सोशल मीडियावर हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर weddings fever नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला लोकांची भरपूर पसंती मिळत आहे. एका यूजरने म्हटलं की नवरीची अशी एन्ट्री पहिल्यांदाच पाहिली. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, आजपर्यंत अशाप्रकारे रथावर फक्त नवरदेवालाच एन्ट्री करताना पाहिलं होतं आणि आज नवरीलाही पाहिलं. व्हायरल होणारा हा व्हिडिओ काहीच सेकंदाचा आहे. मात्र नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करत असून व्हिडिओ शेअरही करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या