लंडन, 09 जून : स्विमिंगसाठी खास स्विमिंग कॉस्ट्युम असतात. पण तुम्ही कधी असं कॉस्ट्युम पाहिलं आहे जे पाण्यात जाताच गायब होतं. असाच एक आश्चर्यकारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान
व्हायरल
होतो आहे. एक व्यक्ती फक्त अंडरविअर घालून स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेली. पण जशी ती पाण्यात उतरली तशी तिची अंडरविअरच गायब झाली. यूकेमधील ही घटना. दोन मित्र बेनिडॉर्म हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये मौजमजा करण्यासाठी आले होते. एकाचं नाव डॅरेन तर दुसऱ्याचं ग्रॅहम. 46 वर्षांच्या डॅरेनला 36 वर्षीय ग्रॅहमने एक बॉक्सर गिफ्ट केली. त्याचा रंग थोडा विचित्र होता. डॅरेनलाही सुरुवातीला तो रंग विचित्र वाटला. पण मित्रानं दिलेलं गिफ्ट म्हणून डॅऱेन आवडीने तीच अंडरविअर घालून स्विमिंग पूलच्या पाण्यात उतरला. पण त्यानंतर असं काही घडलं ज्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. त्याने घातलेली अंडरविअर अचानक पाण्यात विरघळली. काही क्षणात ती त्याच्या शरीरावरून गायब झाली.
अरे हिला आवरा! मेट्रोत पुरुषांच्या गर्दीत तरुणीचं असं कृत्य; VIRAL VIDEO पाहून तोंडाला लावाल हात
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता डॅरेन स्विमिंग पूलच्या बाहेर असताना त्याच्या शरीरावर बॉक्सर दिसते आहे. तो पाण्यात जातो, पोहोतो. पण थोड्या वेळाने त्याच्या शरीरावरील अंडरविअर त्याच्या शरीरापासून वेगळी झालेली दिसते. डॅरेनलाही धक्का बसतो. त्याला लाज वाटू लागते. तो आपल्या मित्राला याबाबत विचारतो. तेव्हा आपल्यासोबत मोठा प्रँक झाल्याचं समजतं. ग्रॅहमने डॅरेनला गिफ्ट केलेली ही अंडरविअर पाण्यात विरघळणारी होती. जेव्हा डॅरेनला याबाबत समजतं तेव्हा त्याला खूप राग येतो. व्हिडीओच्या शेवटी तो टॉवेल गुंडाळून स्विमिंग पूलबाहेर आलेला दिसतो. त्यावेळी त्याचा मित्र त्याची छेड काढायला जातो. तेव्हा त्याने दिलेली अंडरविअर तो रागात फेकून तिथून निघून जातो.
एक नंबर आजी! ब्रेकअप झालेल्या नातीला दिला लय भारी सल्ला; VIRAL VIDEO एकदा पाहाच
आतापर्यंत तुम्ही नदीत अंघोळ करायला गेलेल्या एखाद्या व्यक्तीचे कपडे कुणीतरी पळवून किंवा चोरून नेल्याचं पाहिलं असेल. प्रत्यक्षात नाहीतर फिल्ममध्ये तरी. किंवा तुमच्यासोबत असं झालं असेल, किंवा तुम्ही असं कुणासोबत तरी केलं असेल. पण या व्हिडीओतील प्रकार मात्र वेगळा आहे. इथं कपडे पळवण्याची गरज पडली नाही, तर कपडेच आपोआप गायब झाले.