JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral News : दोन मैत्रीणींना एकमेकींवर झालं प्रेम, सत्य समोर येताच घडलं असं की....

Viral News : दोन मैत्रीणींना एकमेकींवर झालं प्रेम, सत्य समोर येताच घडलं असं की....

जगभरात अनेक निरनिराळ्या लव्ह स्टोरी आहेत. लोक आपल्या प्रेमासाठी अनेक अडचणींचा सामना करतात. सोशल मीडियावर अशा अनेक लव्ह स्टोरी चर्चेत येत असतात.

जाहिरात

दोन मैत्रीणींना एकमेकींवर झालं प्रेम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 जुलै : जगभरात अनेक निरनिराळ्या लव्ह स्टोरी आहेत. लोक आपल्या प्रेमासाठी अनेक अडचणींचा सामना करतात. सोशल मीडियावर अशा अनेक लव्ह स्टोरी चर्चेत येत असतात. नुकतीच एक लव्ह स्टोरी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ज्यामध्ये दोन मैत्रिणींना ऐकमेकांवर प्रेम झालं. त्यांचं सत्य समोर येताच काय झालं याविषयी जाणून घेऊया. 17 वर्षाची असताना जेमीनं एका हॅलोवीन पार्टीत आपली मैत्रिण सबाला सांगतिलं की ती तिला पसंत करते. हे सांगितल्यावर तिला आपल्या खास मैत्रिणीसोबत मैत्री तुटण्याची भिती वाटू लागली. मेट्रो युकेच्या रिपोर्टनुसार, दोघी दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये भेटल्या. शबानंही जेमीला सांगितलं की, तीदेखील तिच्याविषयी हाच विचार करते. तीदेखील तिला लाईक करते.

जेमी आणि शबाने डेटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांना ही गोष्ट घरी कळाल्यावर काय होईल याची भिती होती. सुरुवातीला तर जेमीला तिला मुली का आवडतात हेच समजलं नाही. एकदा टीव्ही बघताना तिला ट्रान्सजेन्डर शब्दाची माहिती झाली आणि तिचं आयुष्य बदललं. जेमीनं तिच्या कुटुंबियांनी आणि मित्रांने हे सांगितलं. त्यानंतर जेमीनं तिच्या शरीरात बदल करु घेतले. तिनं लिंग बदलण्याचा निर्णय घेतला. हळूहळू घरच्यांनीही त्यांच्या नात्याला स्विकारायला सुरुवात केली. दोघंही लग्नबंधनात अडकले असून पुढील प्रवासासाठी उत्सुक आहेत. जेमीनं तिच्या इन्स्टाग्रामवरही तिच्या आयुष्यातील हा प्रवास शेअर केला. मृत्यूच्या दारातून आणलं खेचून, आरपीएफ जवानाने वाचवले रेल्वे प्रवाशाचे प्राण; पाहा Video दरम्यान, सोशल मीडियावर अशा अनोख्या, हटके लव्ह स्टोरी समोर येत असतात. यातील काही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणीत व्हायरल हेतात आणि चर्चेचा विषय ठरतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या