जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मृत्यूच्या दारातून आणलं खेचून, आरपीएफ जवानाने वाचवले रेल्वे प्रवाशाचे प्राण; पाहा Video

मृत्यूच्या दारातून आणलं खेचून, आरपीएफ जवानाने वाचवले रेल्वे प्रवाशाचे प्राण; पाहा Video

आरपीएफ जवानाने वाचवले रेल्वे प्रवाशाचे प्राण

आरपीएफ जवानाने वाचवले रेल्वे प्रवाशाचे प्राण

दिवस भरात अनेक वेळा लोक ट्रेनने ये जा करत असतात. भरपूर लांबून प्रवास करत लोक आपल्या कामासाठी बाहेर पडत असतात. ट्रेनने प्रवास करणं जेवढं सेफ आहे आणि तेवढंच घातकही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

विजय वंजारा, मुंबई, 11 जुलै : दिवस भरात अनेक वेळा लोक ट्रेनने ये जा करत असतात. भरपूर लांबून प्रवास करत लोक आपल्या कामासाठी बाहेर पडत असतात. ट्रेनने प्रवास करणं जेवढं सेफ आहे आणि तेवढंच घातकही. त्यामुळे अनेकदा ट्रेनने प्रवास करताना अपघात घडतात. अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. आपण विचारही करु शकत नाही अशा प्रकारे रेल्वे स्थानकावर अपघात घडतात. सध्या एक रेल्वे स्थानकावरील व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एका व्यक्तीचा जीव थोडक्यात बचावला. आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे रेल्वे प्रवाशाचे प्राण वाचले. याचा व्हिडीओही व्हायरल होतोय. रेल्वे स्थानकावर अनेक अपघात घडत असतात. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे रेल्वे प्रवाशाचे प्राण वाचले. लोक जवानाचं कौतुक करत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, प्रवासी गरीब रथ एक्सप्रेस ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात एका व्यक्तीचा त्याचा तोल गेला आणि तो चालत्या ट्रेनला लटकला. त्याचा पाय प्लॅटफॉर्मवर घसरला आणि तो रुळावर जाणार होता तेवढ्यात आरपीएफ जवान तिकडून पळत आला आणि त्याने व्यक्तीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं.

जाहिरात

मुंबईला लागून असलेल्या ठाण्यातील दिवा स्थानकात घडलेली घटना आहे. सीसीटीव्ही व्हिडीओ समोर येताच लोक आरपीएफ जवानाचं कौतुक करत आहेत. त्याच्या सतर्कतेचं कौतुक करतायेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात