कासवाने सापावर केला जबर हल्ला
नवी दिल्ली 09 जुलै : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असतं. पण कधी-कधी अशी दृश्ये कॅमेऱ्यात कैद होतात, जी पाहून लोकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होऊन जातं. कासव हा शाकाहारी प्राणी आहे, असं तुम्ही मानत असाल. मात्र कासवाशी संबंधित असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही चकित व्हाल. कारण, व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये कासव चक्क एका सापाला खाऊन आपली भूक भागवताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नदीत एका खडकाच्या खाली एक कासव लपून बसलं आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाह खूप वेगवान आहे. इतक्यात वाहत्या पाण्यातील खडकाजवळ एक साप येतो. यानंतर पुढच्या क्षणी जे काही घडतं ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. कासव चटकन खडकाच्या खालून बाहेर पडतं आणि डोळ्याची पापणी मिटण्याच्या आत पटकन सापाला आपल्या तोंडात पकडतं. व्हिडिओमध्ये कासवाची चपळता पाहण्यासारखी आहे.
कासवाचा हा अजब व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @unilad नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यूजरने आश्चर्यचकित होऊन कॅप्शनमध्ये लिहिलं, की मला कल्पना नव्हती की कासव देखील साप खाऊ शकतं. या व्हिडिओला आतापर्यंत 77 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. हा व्हिडिओ पाहून बहुतांश युजर्सना धक्का बसला आहे. मृत्यूच्या दाढेतून परत आला कुत्रा; अंगावरुन ट्रेन गेली पण पुढच्याच क्षणी…, थक्क करणारा Video एका वापरकर्त्याने मजेशीर पद्धतीने कमेंट केली की, लो भैया…आणि मी विचार करत होतो की कासवाला पिझ्झा आवडतो. तर, दुसरा म्हणाला, की काही कासवं खूप हुशार असतात. हे त्यापैकी एक असेल. आणखी एका यूजरने लिहिलं आहे की, कासवाने सापावर ज्या वेगाने हल्ला केला ते पाहून मी थक्क झालो. इतरही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.