JOIN US
मराठी बातम्या / Viral / हा VIDEO विचलित करू शकतो! रेल्वे ट्रॅकवर रिल बनवत होता तरुण, मागून वेगात ट्रेन आली अन्..भयानक दुर्घटना

हा VIDEO विचलित करू शकतो! रेल्वे ट्रॅकवर रिल बनवत होता तरुण, मागून वेगात ट्रेन आली अन्..भयानक दुर्घटना

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुण रेल्वे रुळांच्या मध्यभागी चालत आहे आणि त्याचे काही मित्र त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत. तेवढ्यात मागून एक ट्रेन येताना दिसते.

जाहिरात

भीषण अपघाताचा व्हिडिओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 06 मे : सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवून टाकणं आणि लोकप्रिय होण्याची क्रेझ काही लोकांच्या डोक्यात जाते. आजच्या जगात तुम्हाला जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन सापडेल. आजकाल लोक इंस्टाग्राम सर्वात जास्त वापरत आहेत. विशेषतः तरुण मुलं आणि मुली रील्स बनवण्यात आघाडीवर आहेत. त्यांचं नृत्य, गायन, क्रिएटिव्हिटी आणि टॅलेंट यात पाहायला मिळतं. या व्यतिरिक्त, बरेच लोक स्टंट व्हिडिओ आणि अनेक आश्चर्यकारक व्हिडिओ बनवताना देखील दिसतात. चमत्कारापेक्षा कमी नाही ही घटना; मृत्यूच्या दारातून परत आला मुलगा, थरकाप उडवणारा VIDEO हृदयद्रावक रेल्वे अपघाताचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केल्यानंतर पुन्हा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सर्वांसमोर आणण्यामागचा उद्देश हा आहे की, या अपघातातून लोकांनी धडा घेऊन असं काही करताना दहावेळा विचार करावा. या 15 सेकंदाच्या व्हिडिओला आतापर्यंत 2.4 मिलियन म्हणजेच 24 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर या व्हिडिओला आतापर्यंत 63 हजार लाईक्स मिळाले आहेत.

संबंधित बातम्या

रील बनवताना एक तरुण कसा अपघाताचा बळी ठरतो, हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुण रेल्वे रुळांच्या मध्यभागी चालत आहे आणि त्याचे काही मित्र त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत. तेवढ्यात मागून एक ट्रेन येताना दिसते. तरुणाला कदाचित वाटतं, की तो रेल्वे ट्रॅकपासून खूप दूर आहे आणि ट्रेन त्याला धक्का न लावता त्याच्या जवळून जाईल. यामुळे त्याचा व्हिडिओ अधिक खास बनेल. मात्र घडतं भलतंच. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून शकता, की घडतं त्याच्या अगदी उलट आणि ट्रेनची या मुलाला जोराची धडक बसते. व्हिडिओ पाहून या तरुणाला या अपघातात गंभीर दुखापत झाली असावी, असं समजतं. म्हणूनच व्हिडिओ बनवण्याच्या प्रक्रियेत नेहमी सतर्क राहा आणि आपला जीव धोक्यात घालू नका, असं सांगितलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या