JOIN US
मराठी बातम्या / Viral / विसरलेल्या फोनचं लॉक स्क्रीन पाहताच सर्वांनाच बसला धक्का, नक्की त्यात असं काय होतं?

विसरलेल्या फोनचं लॉक स्क्रीन पाहताच सर्वांनाच बसला धक्का, नक्की त्यात असं काय होतं?

विचार करा जेव्हा एखाद्याचा वैयक्तिक फोन कुठेतरी हरवला आणि त्यामुळे इतरांनाही त्या व्यक्तीबद्दल एकादी अशी माहिती किंवा रहस्य कळलं जे त्याने इतरांपासून लपवून ठेवलं आहे तर?

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जुलै : आजच्या काळात मोबाईल ही एवढी महत्त्वाची गोष्ट बनली आहे की कुठेही गेलं तरी आपल्याला तो हातात लागतोच. अगदी फोन करण्यापासून ते आलार्म लावणे, गणित करणे, फोटो काढणे, सिनेमा पहाणे, ऑफिसची काम करणे सगळंच आपण त्यावर करत असतो. त्यामुळे फोन शिवाय रहाण्याचा विचार कोणीही करु शकत नाही. काही लोक आपल्या फोनला आपल्या मनाप्रमाणे डिझाइन करतात. यामध्ये त्याचा रंग, कवर, वॉलपेपर, थिम सारख्या गोष्टींचा समावेश आहे. फोनी पर्सनल गोष्ट असल्यामुळे आपण त्याला दुसरं कोणालाही हात लावायला देत नाही. परंतु एका व्यक्तीच्या फोनला जेव्हा दुसऱ्या व्यक्तीनं पाहिला तेव्हा त्याला धक्का बसला. विचार करा जेव्हा एखाद्याचा वैयक्तिक फोन कुठेतरी हरवला आणि त्यामुळे इतरांनाही त्या व्यक्तीबद्दल एकादी अशी माहिती किंवा रहस्य कळलं जे त्याने इतरांपासून लपवून ठेवलं आहे तर? असाच प्रकार एका पर्यटकासोबत घडला जेव्हा तो ऑस्ट्रेलियातील एका रिसॉर्टमध्ये त्याचा फोन विसरला. त्याच्या लॉक स्क्रीनवर एक मोठे रहस्य लिहिलं होतं. डेली स्टार न्यूज वेबसाईटच्या वृत्तानुसार, लोक ऑस्ट्रेलियातील कोशिउस्को नॅशनल पार्कमध्ये बर्फावर स्कीइंगचा आनंद घेण्यासाठी येतात. येथे एक पेरीशर स्की रिसॉर्ट आहे जिथे ही मजेदार घटना घडली. वास्तविक, एक पर्यटक या नॅशनल पार्कला भेट देण्यासाठी आला होता आणि तो पेरीशर रिसॉर्टमध्ये थांबला होता. पण तो तेथे आपला फोन विसरला. तो फोन कोणाचा आहे यासाठी चौकीशीसाठी फोन पाहिला असता त्याच्या वॉलपेपरवर विचित्र गोष्ट दिसली. Samsung Galaxy S-20 फोनच्या लॉक स्क्रीनवर काही लिहिलेला फोटो होता. एकतर त्या व्यक्तीने स्वतःला प्रेरित करण्यासाठी ते लावले असावे किंवा आठवण म्हणून ते लावले असावे. रिसॉर्टने हा फोटो Perishers Snow Lovers Group या फेसबुक ग्रुपवर पोस्ट केला आहे. हे वाचून रिसॉर्टमधील लोकांनाही आश्चर्य वाटले.

लॉक स्क्रीनवर 8 गुण लिहिलेले आहेत जे खालीलप्रमाणे आहेत- 1. व्यायाम करून 87 किलो वजन वाढवणे 2. सर्व प्रकारचे निकोटीन सोडणे 3. बँक खात्यात 25 हजार डॉलर्स असणे 4. मोटारसायकल खरेदी करणे 5. लढाईत चांगले होणे 6. विद्यापीठात चांगले गुण मिळवणे 7. एकाच वेळी 3 मुलींना डेटिंग करणे 8. 3 महिने केस कापू नये हे फारच विचित्र असल्यामुळे सोशल मीडियावर या वॉलपेपरची जोरदार चर्चा रंगली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या