JOIN US
मराठी बातम्या / Viral / अरेच्चा! शाकाहारी वाघ कधी पाहिलाय का? गवत खातानाचा हा Video पाहून व्हाल चकित

अरेच्चा! शाकाहारी वाघ कधी पाहिलाय का? गवत खातानाचा हा Video पाहून व्हाल चकित

हे दृश्य पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

जाहिरात

गवत खाताना वाघ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुर्गेश सिंह राजपूत, प्रतिनिधी नर्मदापुरम, 13 जुलै : मध्यप्रदेशातील नमर्दापुरम जिल्ह्यातील सातपुडा व्याघ्र प्रकल्पात वाघ दिसणे, ही आता सामान्य बाब आहे. कधी तलावात पाणी पिताना, तर पर्यटक जिप्सीमध्ये असताना, अशा अनेक परिस्थितीत या वातावरणात इथे येणाऱ्या पर्यटकांना अनेक वेळा वाघ दिसला आहे. मात्र, आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. वाघ हा गवत खाताना दिसला आहे. वाघ गवत खात असल्याचे हे दृश्य पाहून लोकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. तुम्ही विचार करत असाल की, वाघ हा तर मांस खातो. त्यामुळे तो गवत कसे खाऊ शकतो? त्यात असेही म्हटले जाते की, वाघ जंगलाच असो की पिंजऱ्यात तो गवत कधीच खात नाही. मात्र, सातपुडा व्याघ्र प्रकल्पात वाघाने गवत खाल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

हा व्हिडिओ सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकृत  सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. वाघ गवत खात असल्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर याप्रकरणी वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, कधी कधी वाघ हा खाल्लेले अन्न पचवण्यासाठी गवत खातो. हा व्हिडिओ तेव्हाचा आहे, जेव्हा हा वाघ आपली पचनक्रिया ठीक करण्यासाठी गवत खात होता. सर्व वन्य प्राणी, ज्यामध्ये वाघाचाही समावेश आहे, ते सर्व वेळवेळी गवत खातात, असे सातपुडा व्याघ्र प्रकल्प प्रशासनाकडून पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. हे पचनाच्या मदतीसाठी आहे, असे त्यांनी म्हटले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या