JOIN US
मराठी बातम्या / Viral / सिंहाच्या कळपाचा महायक मगरीशी सामना; शिकारीचा थरारक VIDEO VIRAL

सिंहाच्या कळपाचा महायक मगरीशी सामना; शिकारीचा थरारक VIDEO VIRAL

प्राण्यांच्या शिकारीच्या थराराचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्राण्यांचे अनेक धोकादायक आणि भितीदायक व्हिडीओ समोर येत असतात.

जाहिरात

व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : प्राण्यांच्या शिकारीच्या थराराचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्राण्यांचे अनेक धोकादायक आणि भितीदायक व्हिडीओ समोर येत असतात. अशातच प्राण्यांच्या शिकारीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून तो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. सिंहाच्या कळपाने महाकाय मगरीवर केलेल्या हल्ल्याचा हा व्हिडीओ आहे. मगर हा असा प्राणी आहे की जंगलाचा राजा जरी त्याच्या जबड्यात आला तरी तो त्याचा खेळही संपवू शकतो. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सिंह आणि सिंहिणींचा कळप एकाकी मगरीवर हल्ला करताना दिसत आहे. मात्र, मगरीच्या जबड्याच्या सामर्थ्याची त्यांना चांगली कल्पना आहे, त्यामुळे कदाचित सिंहांचा हा कळप या भयानक मगरीची शिकार करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा प्रयत्न करत आहे. एक सिंह अत्यंत भीतीने मगरीचा पाय दातांनी पकडण्याचा प्रयत्न करतो. मगरही त्याला पकडण्याचा प्रयत्न करते. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मगर सतत सिंहाशी लढताना दिसत आहे, तोच सिंह मगरीला पाण्यात जाण्यापासून रोखत आहे.

संबंधित बातम्या

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर latestkrug या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. सिंह आणि मगरीची झुंज पाहिल्यानंतर भीतीदेखील वाटत असल्याचं नेटकरी म्हणत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 75 हजार लाइक्स आणि 6 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, सिंह, वाघ, अस्वल, हरिण, अशा प्राण्यांच्या शिकारीचे अनेक भयानक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर होत होतात. सोशल मीडियावर वन्यजीवांचे व्हिडिओ पाहणे प्रत्येकाला आवडते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या