JOIN US
मराठी बातम्या / Viral / OMG! तुम्ही तरी कधी पाहिली आहे का अशी गाय? सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय हा VIDEO

OMG! तुम्ही तरी कधी पाहिली आहे का अशी गाय? सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय हा VIDEO

या गायीचा व्हिडीओ पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.

जाहिरात

गायीची सोशल मीडियावर चर्चा.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 फेब्रुवारी :  प्राण्यां चे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही वेळा विचित्र प्राण्यांचेही व्हिडीओ असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि सर्वजण हैराण झाले आहेत. एका गाईचा हा व्हिडीओ आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या गाईत असं काही दिसून आलं आहे की पाहणारा प्रत्येक जण चक्रावला आहे. सामान्यपणे गाईला दोन कान, एक नाक, दोन छोटी-छोटी शिंगं, दोन डोळे, चार पाय असे अवयव असतात. पण ही गाय मात्र सामान्य गायींपेक्षा वेगळं आहे. तिच्यात असं काही खास आहे, की ती सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली. कदाचित अशी गाय तुम्हीही आयुष्यात कधीच पाहिली नसावी. त्यामुळे व्हिडीओ पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल. आता असं या गायीत काय आहे हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही लागली असेल. चला तर पाहुयात. हे वाचा -  VIDEO - दूर पळून नाही तर शिकाऱ्याजवळ जाऊन वाचवला स्वतःचा जीव; हरणाची नवी शक्कल पाहून शिकारीही थक्क व्हिडीओत पाहू शकता, एक गवताळ ठिकाणी हा प्राणी दिसतो आहे. ज्याचा रंग काळा आहे. तोंडावर मध्ये मध्ये पांढरा रंग आहे. पण आश्चर्य म्हणजे त्याच्या डोक्यावर दोन नव्हे तर तीन शिंगं आहे. सामान्यपणे एक शिंगी गेंडा सोडला तर शिंग असलेल्या प्राण्यांना  दोन शिंगं असतात. पण या प्राण्याला मात्र तब्बल तीन शिंग. शिंगांचा आकारही इतका मोठा आहे, ही पाहूनच थक्क व्हाययला होतं. बैलांचीही शिंगंही इतकी मोठी नसतात.

नुकताच @NarendraNeer007 ट्विटर अकाऊंटववरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात कॅप्शनमध्ये या प्राण्याला बैल म्हटलं आहे. म्हणजे हा तीन शिंग असलेला बैल असल्याचं सांगितलं जातं आहे. व्हिडीओ नेमका कुठला ते ट्विटमधून नमूद केलेलं नाही.

पण हाच व्हिडीओ 2020 साली आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला होता. त्यांनी या व्हिडीओवरील नेटिझन्सन्सच्या प्रश्नांना उत्तर देताना हा प्राणी गाय असल्याचं सांगितलं होतं. हे वाचा -  Tick bite : या छोट्याशा कीटकापासून दूरच राहा; चावला तर तुमच्या खाण्याचाही होईल वांदा तसंच हा व्हिडीओ उगांडातील असल्याचीही माहिती त्यांनी दिली होती. या तीन शिंगवाल्या गाईला पाहून त्यांनी त्रिशूल असं कॅप्शन दिलं होतं.

तुम्ही कधी अशी तीन शिंगं असलेला बैल किंवा गाय पाहिली आहे का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या