नवी दिल्ली 27 मार्च : जगात अनेक प्रकारचे जीव आहेत. तुम्ही तुमच्या घराभोवती अनेक प्रकारचे कीटक पाहिले असतील. बहुतेक लोक कीटकांपासून दूर राहणंच पसंत करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की असा एक दुर्मिळ विचित्र महागडा किडा आहे (Weird Expensive Insects), जो तुम्ही पकडला तर तुमचं नशीब बदलू शकतं. हा दुर्मिळ किडा अमूल्य आहे. तो तुमच्या हाती लागला तर घरी बसून तुम्ही करोडपती होऊ शकता नदीवरील पुलाच्या कठड्यावर स्टंट मारताच तोल गेला आणि…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO हा दुर्मिळ किडा पाळण्यासाठी लोक लाखोंचा खर्च करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. हा किडा इतका दुर्मिळ आहे की बाजारात ब्लॅकने त्याची खरेदी केल्यावर त्याची किंमत लाखांपर्यंत पोहोचते. तो पाहायला अतिशय किळसवाणा वाटतो, ज्यामुळे बऱ्याच लोकांना त्याला पाहायचीही इच्छा नसते. पण त्याची खासियत कळताच ते हा किडा विकत घेण्यासाठी लाखोंचा खर्च करायला तयार होतात. आता आम्ही तुम्हाला सांगतो की या किड्याची इतकी किंमत का आहे? वास्तविक या किड्याला स्टॅग बीटल म्हणतात. हा छोटा किडा अनमोल आहे. जो तुम्हाला एका झटक्यात करोडपती बनवू शकतो. असं म्हटलं जातं की हा लहान, अत्यंत दुर्मिळ किडा सुमारे दोन ते तीन इंच मोठा असतो. हा किडा अत्यंत दुर्मिळ आहे. अशा स्थितीत नामशेष होण्याच्या मार्गावर आलेले कीटक विकत घेण्यासाठी प्राणीप्रेमी 50 लाख ते एक कोटी रुपये देण्यास तयार आहेत. चक्क उंदराला पाहून वाघाची मावशीही झाली भीगी बिल्ली; का घाबरलं मांजर पाहा VIDEO तुमच्या घराभोवती तुम्हाला अनेक कीटक दिसत असतील. अशा परिस्थितीत, आम्ही अशी काही वैशिष्ट्ये सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही या दुर्मिळ किड्याला ओळखू शकता. त्याच्या डोक्यावर काळी शिंगे असतात. ते सुमारे चार ते पाच इंच असतात. लोक हा किडा छंदासाठी ठेवतात. या किड्यापासून अनेक महागडी औषधे तयार केल्याचा दावा केला जातो. हा किडा फक्त गरम ठिकाणीच आढळतो. थंड वातावरणात ते मरण पावतात. हा किडा केरकचऱ्यात राहतो. इतकंच नाही तर हा किडा सुमारे सात वर्षे जगतो.